ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
इंदापूर : पुणे सोलापूर रोडवरून इंदापूर च्या दिशेने
दोन इसम दुचाकीवरून अवैध रित्या गांजा ची वाहतूक करत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी(ATS) पथकाला मिळल्यानंतर
बारामती उपविभागाचे डीवायएसपी श्री.नारायण
शिरगावकर व स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना नाकाबंदी करून पकडण्यात आले व त्यांच्याकडून 32 किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह इंदापूर परिसरात गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी पथकाचे किरण कुसाळकर यांना खबऱ्या द्वारे बातमी मिळाली की दोन इसम पुणे सोलापूर रोड वरून इंदापूरच्या दिशेने दुचाकीवर गांजा घेऊन येणार आहेत . मिळालेली ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी बारामती उपविभागाचे डीवायएसपी श्री नारायण शिरगावकर यांना कळविली .
त्यावेळी श्री शिरगावकर हे जिल्ह्याचे रात्रगस्त अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते . त्यांनी तात्काळ इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे व व स्टाफ तसेच दहशतवाद विरोधी पथकाच्या स्टाफ यांच्या मदतीने इंदापुर मध्ये नाकाबंदी केली .
नाकाबंदी मध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन इसम 32 किलो गांजा दुचाकीवर घेऊन मिळून आले . त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली .
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री नारायण शिरगावकर , इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सारंगकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे व स्टाफ तसेच पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते , सहाय्यक फौजदार विश्वास खरात , किरण कुसाळकर , महेंद्र कोरवी , लक्ष्मण राऊत व अरुण पवार या पथकाने केली
No comments:
Post a Comment