कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
भिगवण येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक (ATS) व भिगवण पोलिस स्टेशन यांनी मागील आठवड्यामध्ये कारवाई करून तीन सराईतांकडून ४ गावठी पिस्तूल व ८ जिवंत काडतुसे ताब्यात घेतली होती. हि गावठी पिस्तूल त्यांनी विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आल्या नंतर पुढील तपास करून या सराईत गुन्हेगारांकडून अजून ५ गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे असे एकूण ९ गावठी पिस्तुल व ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक (ATS) स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व भिगवण पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे केली आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.
मागील आठवड्यात केलेल्या कारवाईत यातीन सराईतां कडून ४ गावठी पिस्तुल व ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती.
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुढील तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना विशेष पथक तयार करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व इतर स्टाफ यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने अधिक चौकशी करून पुढील तपासामध्ये ताब्यात घेतलेल्या तीन सराईत गुन्हेगारांकडून अजून पाच गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख भिगवण पोलिस स्टेशन, सहाय्यक फौजदार विश्वास खरात, किरण पांढरे, विजय कांचन, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, अमोल शेडगे, धीरज जाधव, मंगेश भगत, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक व भिगवन पोलीस स्टेशन स्टाफ च्या संयुक्त पथकाने केली.
पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
साप्ता.ग्राहक समाचार News Portal
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक :
श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
📱- ७० ८३ ९५ ६९ ५६
◆ कार्यकारी संपादक :
श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
📱 ९१ ३० ३४ ९२ ९०
◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com
SUBSCRIBE : https://urlzs.com/NrMtx
या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
Join Our Whats app Group
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S
No comments:
Post a Comment