Pages

Monday, May 11, 2020

भागेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने वन्य प्राणी व पक्ष्यांना धान्य आणि पाण्याची व्यवस्था

ग्राहक समाचार News portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक: श्री.अमर भागवत

नारायणगाव प्रतिनिधी | 
           नारायणगाव येथील भागेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चिंचोली येथील वनक्षेत्रात असणाऱ्या वन्यप्राणांसाठी पाण्याची तसेच त्यांना खाण्यासाठी धान्याची  व्यवस्था करण्यात आली आहे.
              वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व वन परिमंडल अधिकारी मनीषा काळे यांच्या समवेत वारूळवाडी ग्रामस्थांनी वन क्षेत्रात पाण्यासाठी २० लिटरच्या पाण्याच्या कुंड्या   व त्यांना खाण्याकरिता मक्याची qकणसे, भुईमूगाच्या शेंगा,बाजरी,तांदूळ,ज्वारी,असे खाद्य उपलब्ध करून दिले.
                   यावेळी मनीषा काळे यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी दिलेल्या कुंड्या रोज भरून ठेऊन वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत तसेच त्यांना धान्य देखील रोज टाकणार आहोत. येथील वानक्षेत्रात ज्या ठिकाणी मोर,सांबर,भेकर, ससे,कोल्हे व वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांना सध्या लॉकडाऊन असल्यामुळे व उन्हामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
                      यावेळी संजय वारुळे, विपुल फुलसुंदर,सचिन वारूळे,संजय वारुळे,आशिष फुलसुंदर,जंगल कोल्हे,संदीप वारुळे,भाऊ बनकर,गणेश वारुळे
,संपत वारुळे, अजित वारुळे, वैभवशेठ वारुळे,
विनेश वारुळे, शुभम वारुळे,महेंद्र वारुळे, विशाल वारुळे, विवेक पडवळ, स्वप्नील वायकर, अभिजीत रेवगडे,चिंचोली येथील संदीप पानसरे वनरक्षक मनीषा बनसोडे रामेश्वर फुलवाड, वनकर्मचारी खंडू भुजबळ , मधुकर  बाळसराफ तसेच भागेश्वर मुक्ताई मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment