Pages

Monday, May 4, 2020

कणखर आयुष्यावर मात करुन परिसस्पर्श लाभलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांची अविस्मरणिय कामगिरी

ग्राहक समाचार (अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक: श्री. अमर भागवत

THE UNBROKEN MAN - API अर्जुन हरिबा मोहिते 
 (शब्दांकन - भानुदास यादव/ अमर भागवत )

            केव्हा काळी दगड फोडणारे हात पुढे पोलीस दलाचे मानकरी ठरतील असे स्वप्नातही वाटले नसेल ईतके अनमोल सत्य पुणे ग्रामीण ATS (दहशतवाद विरोधी पथक) चे API श्री. अर्जुन हरिबा मोहिते यांच्या विविध अष्टपैलू कामगिरी जनसामान्याच्या पुढे येत आहे.

          दगड फोडणारे हात  ठरणार गुन्हेगारांचा कर्दनकाळ हा लेख २०११ साली एका गवंडीकाम करणाऱ्या मुलाविषयी म्हणजेच अर्जुन मोहिते यांच्याविषयी सातारा च्या एका वृत्तपत्रात आला होता. त्यावेळी त्यांची नुकतीच एमपीएससी तुन पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली होती.
       काल महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. मागील नऊ वर्षाच्या त्यांच्या सेवेमध्ये त्यांना विशेष व खडतर सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक  व कर्तव्य काळात दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल पराक्रम पदक तसेच २०० च्यावर  रिवार्ड प्राप्त झाली आहेत.
ते मूळचे सातारा जिल्ह्यातील डिस्कळ या गावचे परंतु २००४  साली मोठा दुष्काळ पडला त्यावेळी ते कामासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तुरुकवाडी या गावी स्थलांतरित झाले. 
             त्यांचे वडील, भाऊ ते स्वतः गवंडीकाम काम करायचे. काम करत करतच त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं व त्याच वर्षी ते एमपीएससीची  परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झाले. 
 नाशिक येथे एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन त्यांची पहिली पोस्टिंग गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली होती.धानोरा तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम भागातील सावरगांव पोस्टे चे प्रभारी पद त्यांना देण्यात आले होते.
दि.6 ऑगस्ट 2014 रोजी ते व त्यांच्या सोबत सहकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील हे कामानिमीत्त दुचाकी वरून जात असताना 15 ते 20 नक्षलवाद्यांनी त्यांचेवर घात लावून अचानक हमला केला. झालेल्या गोळीबारात 6 गोळ्या लागून सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते व चंद्रकांत पाटील ही गंभीर जखमी झाले पंरतु त्याही परिस्थितीत त्यांनी नक्षलवाद्यांशी झुंज देत. नक्षलवाद्यांनी लावलेला अॅम्बुश जो तोडणे फारच अवघड असते असा अॅम्बुश तोडत आपले सहकारी चंद्रकांत पाटील यांना घेऊन स्वत: दुचाकी चालवत तिथुन 6 km असलेल्या सावरगाव पोस्टे पर्यंत त्यांना घेऊन आले.सदर चकमकी नंतर दोघांना हेलीकॉप्टर ने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गडचिरोली येथील कर्तव्यात त्यांनी अनेक नक्षलविरोधी मोहिमेत भाग घेतला. काही नक्षलवाद्यांना अटक करून काही नक्षलवाद्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. नक्षलवाद्यांनी सावरगांव पोस्टे ला रात्रीच्या वेळी घेरून हमला  केला होता तोही हमला त्यांनी व त्यांच्या सहकारी यांनी मोठय़ा शोर्याने परतावून लावला होता.
    परंतु ऑगस्ट २०१४ मध्ये नक्षल बरोबर झालेल्या चकमकीमध्ये सात गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले. जखमा एवढ्या गंभीर होत्या की त्यांचा उजवा पाय पुन्हा जोडण्यात आला. परिस्थिती एवढी गंभीर असताना सुद्धा  त्यापुढे  हतबल न होता दहा महिने उपचार घेऊन ते पुन्हा पुणे ग्रामीण येथे कर्तव्यावर रुजू झाले सुरुवातीच्या काळात पायाला त्रास होत असल्यामुळे ऑफिसची कामे केली. २०१७ साली पुणे ग्रामीण चे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक विशेष पथकाचा  चार्ज त्यांच्याकडे सोपवला. या दोन वर्षाचा कार्यकाळ यांमध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे वाले मोठे गुंड यांना सळो कि पळो करून सोडले. 
              परंतु दरम्यान पुन्हा पायाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा एकदा उजव्या पायाची सर्जरी करून घ्यावी लागली. पुन्हा एकदा उपचार करून ते कर्तव्यावर रुजू झाले. सध्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब यांनी त्यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथकाचा API पदाचा चार्ज सोपवला.
आणि पुन्हा एकदा सुरु झाली.  स्फोटके, अवैद्य अग्निशस्त्र यांच्याविरुद्ध कारवाई. 
              त्यांच्या पायामध्ये अजूनही रॉड आहेत. परिस्थिती त्यांना नेहमी झुकवण्याचा प्रयत्न करते परंतु हा माणूस अजूनही unbroken आहे.
यालाच म्हणतात चाकरमान्याची खरी लोकसेवा.पोलीस दलात कार्यभार संभाळणे म्हणजे आगीतुन प्रवास या प्रवासात अतोनात हाल अपेष्टा सहन करुन संसाराची अप्रतीम स्वप्ने रंगवत लोकसेवा हसतमुखाने करत राहणे हे कसब फार कमी लोकांना जमते .त्यातीलच एक उदाहरण म्हणजे आपले सर्वांचे लाडके व लोकप्रिय ,शिस्तप्रिय समाजकार्यात नेहमी पुढे राहणारे 
THE UNBROKEN MAN
 अर्जुन मोहिते  साहेब !
                  सध्या कोविड - 19 च्या माध्यमातुन पाहिले तर त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबबदारीचे सर्वत्र कौतुक करण्यासारखे आहे. रात्र असो कि दिवस लॉक डाऊनची धुरा संभाळणे म्हणजे तारे वरची कसरत म्हणावी लागेल. आपले कर्तव्य पार  पडत असतानाच  सामाजिक कर्तव्याचे भान म्हणून त्यांनी  आपल्या मूळ गावी गरजूंना  अन्नधान्य पोहोच केले आहे. एक पाय सतत दुखत असताना शरिराचे भान न राखता केवळ सेवा हेच आपले कर्म समजुन चालणा-या या अभिव्यक्तीस मानाचा मुजरा.

8 comments:

  1. Jay hind sir proud of you sir you are real hero real singham Maharashtra Police is proud of you. The service you have rendered is incomparable

    ReplyDelete
  2. Salute sir fill to be proud great job

    ReplyDelete
  3. Salute sir fill to be proud great job

    ReplyDelete
  4. Great Arjuna.... Always proud of You

    ReplyDelete
  5. Mohite saheb you are the really 'Hero'...me & Diskal Village proud of you 🙏🙏🙏🙏Salam

    ReplyDelete
  6. "जय हिंद" सर ,खरच तुम्ही हा देश सेवेचा विंडा उचला हे खरच खुप कौतुकास्पद कार्य आहे खरच तुम्ही रियल मधील हिरो आहे l proud of sir(bro)

    ReplyDelete