Pages

Monday, May 11, 2020

जुन्नर तालुक्यातील कलाकारांना दत्ता जाधव यांच्या प्रयत्नांतून धान्य किट चे वाटप


ग्राहक समाचार News portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
   
                   नारायणगाव (प्रतिनिधी) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील कलाकार कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी 
चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुका अध्यक्ष  दत्ता जाधव यांनी  जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
               बेनके यांनी निवेदन मिळताच तात्काळ कलाकारांना   'एक हात मदतीचा' याकार्यक्रमाअंतर्गत मदत उपलब्ध करून दिली व   कलाकारांना आमदार निवास याठिकाणी अमित शेठ बेनके व सौ.धनश्री बेनके,सुरज वाजगे यांच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले.
                         दत्ता जाधव यांनी जुन्नर तालुक्यातील अनेक कलाकार कुटुंबियांना धान्याचे किट घरपोच नेऊन दिले.
                       दरम्यान दत्ता जाधव यांचे बंधू शंकर जाधव यांनी व त्यांच्या मित्र परिवाराने एक हात मदतीचा ह्या अभियान अंतर्गत आपल्या नारायणगाव आणि मंचर  येथील समाज बांधवांना किराणा वस्तूंचे किट देऊन मदत केली. 
                यासाठी त्यांना ओंकार देशमुख,सागर जाधव,किशोर महामुनी,कैलास हांडे,नितीन वाडकर, व दादा देशमुख यांचे सहकार्य लाभले .




No comments:

Post a Comment