नारायणगाव - महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका अध्यक्षपदी वारुळवाडी ग्रामपंचयतीचे माजी सरपंच आत्माराम संते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.येथील कलासागर मंगल कार्यालयात "महात्मा फुले विचार मंच" जुन्नर तालुका कार्यकारणी आणि वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि महात्मा फुले युवा मंचचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी नुकत्याच पुणे जिल्हा समता परिषदेच्या अध्यक्षपदी निलेश भुजबळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका च्या मागील वर्षी आत्माराम संते यांना अध्यक्ष पदावर काम करताना कोरोना महामारी संकटकाळात समाजाचे काम करण्यास अत्यंत कमी वेळ मिळाला. त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात कमी वेळ मिळूनही उत्कृष्ठ काम संघटनेसाठी झाले.उत्कृष्ठ संघटन आणि सर्वसंमतीने घेतलेले निर्णय या मुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षी पुन्हा संधी मिळावी व कार्यकारणी जैसे थे ठेवावी असे मत अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी जाहीर मांडले होते.यामुळे श्री संते यांची अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष सचिन वऱ्हाडी,प्रसिद्धी प्रमुख हेमंत डोके,जेष्ठ मार्गदर्शक एम. डी. नाना भुजबळ,संदीपशेठ नाईक,अँड.हेमंत भास्कर,योगेश डोके,जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे,काशीनाथ लोखंडे,बाळासाहेब विधाटे, ज्ञानेश्वर कोल्हे,आशिष फुलसुंदर,बाळासाहेब भुजबळ,राहुलशेठ बनकर,विपुल फुलसुंदर,जालिंदर,कोल्हे,संजय कानडे,ग्रामपंचयात सदस्य राजेंद्र मेहेर,महेंद्र मेहेर,राजेंद्र संते,भरत नाईक,सुभाष डोके,शिवदास विधाटे,अनिल घोलप,अशोक गडगे, बारकू गडगे, भानुदास खराडे,नितिन भुजबळ आणि मंडलिक सर. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी तर आभार संस्थापक डी.एल.मस्के सर यांनी मांनले!
No comments:
Post a Comment