Pages

Monday, August 17, 2020

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक मधून लोखंडी गज चोरीचा प्रयत्न करणारेच केले गजाआड : स.पो.नि गुंड यांची माहिती

ग्राहक समाचार News Portal
Reg.R.N.I.No.MAHMAR66462/1997(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव | दि.१७ रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिंडोरी नाशिकहुन पुण्याकडे लोखंडी बार (स्टील) वाहतूक करत असलेले ट्रक थांबवून ड्रायव्हर व क्लिनर यांना धमकावून स्टील ची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ४ इसमांना ताब्यात घेतले आहे.
अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
         
       1) अक्षय बबन महांबरे रा साळवाडी श्रीकृष्णनगर ता जुन्नर जि पुणे 
2)राहुल धोंडीभाऊ बेल्हेकर रा पिरसाहेब नगर साळवाडी बोरी खु|| ता जुन्नर जि पुणे 
3)आदेश बाबाजी भोर रा भोरवाडी येडगाव ता जुन्नर जि पुणे 
4)पंकज गोपीनाथ भोर रा चौदा नंबर ता जुन्नर जि पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
     याबाबत अनिल गोविंद कांबळे वय 40 वर्षे व्यवसाय ट्रान्सपोर्ट रा नम्रता होसिंग सोसायटी नकाते नगर थेरगाव 33 ता हवेली जि पुणे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

पुणे नाशिक महामार्गावर चौदा नंबर येथील स्वामी समर्थ मंदीराजवळ ते रिलायन्स पेट्रोलपंप वारुळवाडी बायपास जवळ ही घटना घडली.

अधिक माहिती अशी की, माऊली ट्रान्सपोर्ट व्यवसाया करीता 40 ते 45 ट्रक/ट्रेलर असुन त्यावर ड्रायव्हर, क्लीनर ठेवलेले असून ट्रान्सपोर्ट कंम्पनीला ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे माल ने-आन करण्यासाठी कंम्पनीचे ड्रायव्हर क्लीनर सह ट्रक/ट्रेलर पाठवत असतात.दिंडोरी नाशिक येथील एम आय टी सी रोलिंग मील या कंम्पनीची टी एम टी (स्टील) मालाचे वाहतुकीची ऑडर असल्याने नेहमी ट्रान्सपोर्ट कंम्पनीचे ट्रक/ट्रेलर दिंडोरी नाशिक ते पुणे अशी टी एम टी (स्टील) मालाची वाहतुक करत असतात. मागील पाच/सहा महिन्या पासुन दिंडोरी नाशिक येथुन वाहतुक करणारे ड्रायव्हर मालक यांना सांगत असत की,आम्हाला दिंडोरी येथुन माल घेवुन येत असताना रस्त्यात अडवणुक मारहाण करून माल चोरी करतात.आम्ही माल आणण्यासाठी जानार नाही.तुम्ही एकदा आमचे सोबत येवुन खात्री करा तुम्ही येत असाल तर आम्ही जातो असे सांगु लागल्याने मालकाने त्यांना तुम्ही गाड्या भरून घेवुन या तुम्हाला अडचन आल्यास मी येतो असे सांगुन 11 गाड्या ड्रायव्हर क्लीनर सह माल आनण्यासाठी पाठवुन दिल्या. 
           दिनांक 16/08/2020 रोजी रात्री 11/30 वा चे सुमारास माल भरूण आलेल्या गाड्या पैकी चालक रमेश देवराम सानप यांने फोन करून आपल्या गाड्या सिन्नर जि अहमदनगर पर्यंत आल्या आहेत.तुम्ही आळेफाटा येथे या असे सांगीतले म्हणुन मालक व त्यांचे सहकारी शिवाजी दळवी,विकी दळवी,प्रमोद ननवरे असे स्वीफ्ट गाडी ने आळेफाटा येथे आले.
                दिनांक 17/08/2020 रोजी रात्री 01/20 वा चे सुमारास गाड्या आऴेफाटा येथे आल्यानंतर मालकाने आळेफाटा पोलीसांची मदत घेवुन पुणे कडे  सर्व गाड्या पुढे घेऊन निघाले असताना चौदा नंबर पास होवुन पुढे स्वामी समर्थ मंदीराचे जवळ त्यांची ट्रक नं एम एच 12 क्यु डब्लु 4765 ही उभी असलेली दिसली जवळ जावुन पाहिले असता त्या ट्रक वरील ड्रायव्हर बाळासाहेब नागरगोजे व त्याचे सोबतचा क्लीनर यांना खाली बसवुन एक इसम दमदाटी करतान व दुसरा इसम ट्रक चे मागील बाजुस ट्रक मध्ये चढुन ट्रक मधील टी एम टी बार ( स्टील ) काढत असलेला दिसला.त्यावेळी पाठीमागुन आलेल्या आळेफाटा पोलीसांनी त्या दोघा इसमाना ताब्यात घेवुन नारायणगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली.
          काही वेळातच नारायणगाव चे पोलीस सदर ठिकाणी आले त्यांनी त्या दोन इसमांना लागलीच ताब्यात घेतले व त्यांना घेवुन पोलीसांसह नारायणगाव पोलीस स्टेशनला आणले.  पोलीसांनी ताब्यात घेतलल्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)अक्षय बबन महांबरे रा साळवाडी श्रीकृष्णनगर ता जुन्नर जि पुणे 2) राहुल धोंडीभाऊ बेल्हेकर रा पिरसाहेब नगर साळवाडी बोरी खु।। ता जुन्नर जि पुणे  असे असल्याचे सांगीतले. पोलीस त्या इसमांना विचारपुस करत असतानाच साधारण 02/00 वा चे सुमारास मालकाच्या मोबाईल वर पुढे गेलेल्या ट्रक वरील ड्रायव्हर रमेश सानप याचा फोन आला व त्यांने सांगीतले की, आपले पुढे आलेले तिन्ही ट्रक रिलायन्स पेट्रोलपंप वारूळवाडी चे पुढील बायपास जवळ दोन इसमांनी थांबवले असुन ते आम्हाला दमदाटी करून ट्रक मधील माल काढत आहेत असे सांगीतले. सदर बाबत त्यांनी पोलीसांना सांगताच लागलीच नारायणगाव पोलीस स्टेशन येथील पो शि गारगोटे, कोबल,लोहटे व पोलीस पथक यांचे सह रिलायन्स पेट्रोलपंपाचे पुढे येत असताना बायपास जवळ ट्रान्सपोर्टचे ट्रक नंबर एम एच 12 क्यु डब्लु 4764,एम एच 14 जी डी 3157, एम एच 12 क्यु जी 4315 हे उभे असलेले दिसले.
पोलीस व ट्रान्सपोर्ट मालक पुढे ट्रक कडे जावु लागले असता त्याठिकाणी एक इसम ट्रक नंबर एम एच 12 क्यु डब्लु 4764 वर चढुन माल काढत असताना व एक इसम सदर ट्रक चे चालक रमेश सानप,युवराज चव्हाण,परमेश्वर केंद्रे यांना खाली बसवुन दमदाटी करत असलेला दिसला मालक व पोलीस त्यांचेकडे येत असलेले पाहुन ते दोघे पळुन जाण्याचा प्रयत्न करू लागले असता पोलीसांनी त्यांना जागेवर पकडुन ताब्यात  घेवुन पोलीस स्टेशन ला आले असता  पोलीसांनी त्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) आदेश बाबजी भोर रा भोरवाडी येडगाव ता जुन्नर जि पुणे 2) पंकज गोपीनाथ भोर रा चौदा नंबर ता जुन्नर जि पुणे असे असल्याचे सांगीतले तसेच ते चौघे ही भंगारमध्ये विकण्या करीता गाड्यामधील टी एम टी बार (स्टील) काढण्यासाठी आले असल्याचा अंदाज मालकाला आल्याने
दिनांक 17/08/2020 रोजी 01/20 वा ते 02/00 वा चे सुमारास ट्रान्सपोर्ट कंम्पनीचे ट्रक दिंडोरी नाशिक ते पुणे अशी टी एम टी (स्टील) मालाची वाहतुक करीत असताना चौदा नंबर येथील स्वामी समर्थ मंदीराजवळ इसम नामे 1)अक्षय बबन महांबरे रा साळवाडी श्रीकृष्णनगर ता जुन्नर जि पुणे 2) राहुल धोंडीभाऊ बेल्हेकर रा पिरसाहेब नगर साळवाडी बोरी खु।। ता जुन्नर जि पुणे तसेच रिलायन्स पेट्रोल पंप वारूळवाडी चे पुढे असनारे बायपास जवळ त्यांचे साथीदार 3) आदेश बाबजी भोर रा भोरवाडी येडगाव ता जुन्नर जि पुणे 4) पंकज गोपीनाथ भोर रा चौदा नंबर ता जुन्नर जि पुणे  यांनी संगणमत करून आमचे ट्रान्सपोर्ट कंम्पनीचे टी एम टी बार (स्टील)भरून घेवुन चाललेले ट्रक थांबवुन त्यावरील ट्रक ड्रायव्हर व क्लीनर यांना दमदाटी करून ट्रक मधील टी एम टी बार (स्टील) चोरून नेण्याचा प्रयत्न केला.म्हणुन 
त्यांच्यावर भा द वि कलम 379,511,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पो.ना लोंढे करीत आहेत.

साप्ता.ग्राहक समाचार News Portal

Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997

(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)

◆ मालक /प्रकाशक/संपादक : 

         श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत

 📱- ७० ८३ ९५ ६९ ५६

◆ कार्यकारी संपादक : 

         श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत

 📱 ९१ ३० ३४ ९२ ९०

◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क

Email - grahaksamacharnews@gmail.com


                                                  SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx

 या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37

Join Our Whats app Group       

https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S

No comments:

Post a Comment