Pages

Monday, August 17, 2020

मा.शरदचंद्रजी पवार साहेब "आरोग्य मंदिर" या कोव्हिड सेंटरसाठी पारनेरच्या शिक्षकांची ७१ हजार रूपयांची मदत

 


आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आज कर्जुले हर्या येथे आज लोकार्पण झालेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या कोव्हिड सेंटरसाठी शिक्षक नेते विजयराव काकडे व मित्रमंडळाने १० ऑगस्ट रोजी आपल्या शिक्षक मित्रमंडळींचा एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. ग्रुपवर मदतीचे आवाहन केले आपल्या मित्रांच्या हाकेला साद देऊन आपण सर्व मित्र परिवाराने खारीचा वाटा उचलून या कोव्हिड सेंटरसाठी आर्थिक मदतीचा हातभार लागावा म्हणून सहकार्य केले. 
अवघ्या तीन दिवसात ७१ हजार रूपयांची मदत कोव्हिड सेंटर साठी उभी राहिली. यासाठी कोणासही खास आग्रह अथवा फोन करावा लागला नाही हे विशेष ! आर्थिक मदत किती आहे हे महत्वाचे नाही तर पारनेर तालुक्यातून या कामासाठी शिक्षक मित्रांनी पुढाकार घेतला याबाबत आ.निलेश लंके यांनाही या शिक्षकांचा सार्थ अभिमान वाटला. तन-मन-धनाने अहोरात्र जनतेच्या समस्यांसाठी लढणाऱ्या आ.लंके यांच्या या कार्यात सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना विजय काकडे यांनी धन्यवाद दिले आहेत. आज झालेल्या लोकार्पण सोहळयात हा निधी सुपुर्द करण्यात आला.

या मदतनिधीसाठी अंबादास काकडे, बिंदकुमार नरड, संतोष खामकर, सचिन गाडीलकर, दादाभाऊ कोल्हे, पोपट नवले, आदी प्राथमिक शिक्षक मित्र परिवाराने मदत केली. शिक्षकांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment