सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टि.वाय.मुजावर, पोलीस हवालदार भोईर ,पोलीस नाईक फड ,पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, पोलीस कॉन्स्टेबल मोमीन, चालक पोलीस कॉन्स्टेबल समाधान अहिवळे ,होमगार्ड शिरतर या पथकाने केली आहे.
Pages
Monday, August 24, 2020
झापवाडी गावच्या हद्दीत दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना आळेफाटा पोलिसांकडून अटक
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टि.वाय.मुजावर, पोलीस हवालदार भोईर ,पोलीस नाईक फड ,पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, पोलीस कॉन्स्टेबल मोमीन, चालक पोलीस कॉन्स्टेबल समाधान अहिवळे ,होमगार्ड शिरतर या पथकाने केली आहे.
Sunday, August 23, 2020
फरारी खुनी आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केले जेरबंद
Saturday, August 22, 2020
जुन्नर शहरात घरफोड्या करणारा आरोपी मंदार उर्फ सोमनाथ रासने ला LCB पथकाने सापळा रचून पकडले
Tuesday, August 18, 2020
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव काळात सूचनांचे पालन करा : स.पो.नि.गुंड
दि. १८/०८/२०२० रोजी नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील वारूळवाडी, नारायणगाव गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य यांची मिटींग पोलिस स्टेशन सभागृहात घेण्यात आली. सदर मिटींगमध्ये कोरोनाच्या
Monday, August 17, 2020
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक मधून लोखंडी गज चोरीचा प्रयत्न करणारेच केले गजाआड : स.पो.नि गुंड यांची माहिती
मा.शरदचंद्रजी पवार साहेब "आरोग्य मंदिर" या कोव्हिड सेंटरसाठी पारनेरच्या शिक्षकांची ७१ हजार रूपयांची मदत
अवघ्या तीन दिवसात ७१ हजार रूपयांची मदत कोव्हिड सेंटर साठी उभी राहिली. यासाठी कोणासही खास आग्रह अथवा फोन करावा लागला नाही हे विशेष ! आर्थिक मदत किती आहे हे महत्वाचे नाही तर पारनेर तालुक्यातून या कामासाठी शिक्षक मित्रांनी पुढाकार घेतला याबाबत आ.निलेश लंके यांनाही या शिक्षकांचा सार्थ अभिमान वाटला. तन-मन-धनाने अहोरात्र जनतेच्या समस्यांसाठी लढणाऱ्या आ.लंके यांच्या या कार्यात सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना विजय काकडे यांनी धन्यवाद दिले आहेत. आज झालेल्या लोकार्पण सोहळयात हा निधी सुपुर्द करण्यात आला.
Saturday, August 15, 2020
नारायणगाव ग्रामपंचायत येथे कोरोना योद्धांच्या हस्ते ध्वजारोहन..
Wednesday, August 12, 2020
नारायणगावचे स.पो.नि.घोडे पाटील शिक्रापूर चे पो.ना.इनामे सेवेतून निलंबित तर नारायणगाव पो.ना.हांडे बडतर्फ
Monday, August 10, 2020
वारुळवाडी च्या वैभवात भर पडणाऱ्या नाविन्यपूर्ण ग्राम संसद इमारतीचे उद्घाटन खा. कोल्हे यांच्या शुभ हस्ते संपन्न
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सोबलेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
श्रीनिवास शिंदे ( उपसंपादक, ग्राहक समाचार )
पारनेर ( प्रतिनिधी ),
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी मधील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेमधे दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगेसर हे होते.
कार्यक्रमा चे सुरवातीला पिंप्री जलसेनपुत्र नायक भरत कदम यांना सामुदायिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी १० वी व १२ वी मधील विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवुन सन्मानित करण्यात आले. १२ वी मधे तालुक्यामधे प्रथम आलेल्या कु.समृध्दी समिर अंबे हिच्यासह इयत्ता १० वी मधील गायश्री साहेबराव सोबले, अभिषेक जनार्दन गोसावी, सिध्दी बाबाजी औटी, वैष्णवी संतोष म्हस्के, सुप्रिया बापु सोबले आदींचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पारनेर च्या नगरसेविका विजेता विलास सोबले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते समिर अंबे, मेजर साहेबराव सोबले, मुख्याध्यापक प्रकाश नांगरे सर, पारनेर तहसिलचे सिनियर क्लर्क महेंद्र रोकडे, योगेश शेरकर, विकास शेरकर, अमोल शेरकर, रामदेव गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले. आजचा विद्यार्थी भविष्यकाळामधे या देशाचा सुजान नागरीक असणार असुन, देशाचे भविष्य असल्याचे सांगीतले. भविष्यामधे यामधील विद्यार्थ्यांमधुन आपीएस,आय् ए एस दर्जाचे अधिकारी बनुण यावेत आणि आम्हाला पुन्हा एकदा सत्काराची संधी मिळावी अशी आशा व्यक्त केली. विद्यार्थ्यां सोबतच शिक्षक आणि आई वडीलांचेही विद्यार्थ्यांच्या यशामधे महत्वाचे योगदान असल्याचे सांगीतले.
प्रास्ताविकामधे बोलताना मुख्याध्यापक प्रकाश नांगरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाने आज आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. अशीच कौतुकाची थाप भविष्यातही कायम ठेवावी. प्रास्ताविक जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नांगरे यांनी तर आभार पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले यांनी व्यक्त केले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक अरुणराव आंधळे, उपाध्यक्ष विनोद गायकवाड, राम तांबे, दत्ता ठुबे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, संपर्क प्रमुख संजय मोरे, प्रसिध्दीप्रमुख श्रीनिवास शिंदे, उपसचिव बाबाजी वाघमारे, सदस्य गंगाधर धावडे, संपत वैरागर आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मास्क व सॅनिटायझर लावुन कार्यक्रम नियमामधे घेण्यात आला.
Sunday, August 9, 2020
आणे येथे हरियाणा राज्याकरिता विक्री साठी चा दारू साठा केला जप्त.राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.
Saturday, August 1, 2020
तिखोल ग्रामपंचायत समोरील चौकातील इलेक्ट्रिक पोल काढल्यामुळे ग्रामस्थामध्ये समाधानाचे वातावरण
टाकळी ढोकेश्वर ( पारनेर ) :
तिखोल ग्रामपंचायत समोरील चौकात इलेक्ट्रिक पोल व पांढरीचा टेक येथील इलेक्ट्रिक पोल खराब झालेमुळे व हायमॅक्स असल्यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात अडचण होती.ग्रामस्थांची इलेक्ट्रिक पोल व हायमॅक्स चौकातुन काढुन बाजुला लावण्याची अनेक वर्षांपासून मागणी होती.तसेच गावात सिंगल फेज लाईट नसल्या मुळे गावांत वारंवार लाईट जात होती.त्या मुळे मागील आठवडय़ात अधिक्षक अभियंता श्री.सांगळे साहेब यांचेशी संपर्क साधून पारनेर विज मंडळ कार्यालयात उपअभियंता श्री.आडभाई व सहायक अभियंता श्री.पाटील यांची मा.सभापती अरुणराव ठाणगे व चेअरमन जालिंदर ठाणगे यांनी समक्ष भेट घेऊन चर्चा केली असता वरील दोनही कामे तातडीने मार्गी लावले आहेत.
या कामासाठी मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आज तातडीने इलेक्ट्रिक पोल व हायमॅक्स काढुन साईट ला लावनेत आले आहेत.व लवकर सिंगल फेज चे काम सुध्दा सुरु होईल. या कामाबद्दल मा.उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, उपअभियंता आडभाई साहेब,सहाय्यक अभियंता पाटील साहेब,वायरमन बाळु खोडदे यांचे तिखोल ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.आज या कमासाठी सुनील शेठ ठाणगे,साहेबराव ठाणगे,भोमा ठाणगे,अनिल ठाणगे,गणेश ठाणगे,बाळु ठाणगे,महम्मद तांबोळी,पप्पु ठाणगे,अमोल साळवे,बबन मेजर,सतीश शेंडगे,अतुल ठाणगे,टिप्पु ठाणगे,युवराज साळवे,राहुल साळवे, विठ्ठल ठाणगे,संकेत ठाणगे,राघु साळवे, साहेबराव साळवे,अश्र्वीन मंचरे,नागचंद ठाणगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



