Pages

▼

Sunday, June 21, 2020

निमगावसाव्यात सरकारी अधिकारी व पोलीस दलाचा लोगो वापरून बनावट प्रवासी पासची विक्री करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव | नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव सावा ता. जुन्नर येथे दि. 20/06/2020 रोजी अनिस महम्मदहनिफ पटेल (वय 24 वर्षे) धंदा फोटो स्टुडिओ रा. निमगावसावा ता. जुन्नर जि.पुणे याने त्याच्याअनिस फोटो स्टुडीओ निमगावसावा येथे स्वतःच्या आर्थिक फायदया करीता लॉक डाउन मध्ये जिल्हा बंदी असताना सरकारी अधिकारी तसेच पोलीस दलाच्या चिन्हांचा वापर करून कोणतीही सरकारी परवाणगी नसताना अनाधिकृत पणे त्याच्या फोटो स्टुडिओ मध्ये ऑनलाईन बनावट आंतरजिल्हा प्रवासी पास तयार करून  येणाऱ्या ग्राहकांची फसवणुक करून ते पास विक्री करत असताना मिळून आल्याने   त्याच्या  विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.   
        अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
      याबाबत संतोष अंकुश दुपारगुडे पो.कॉ. नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
         आरोपीकडून १) १०,०००/ -  रु किं एक काळ्या रंगाचा लॅपटॉप जु वा कि अं २) २३,०००/ -  रु किं काळ्या रंगाचा मॉनिटर व सीपीयु जु वा कि अं
३) १२,०००/ -  रु किं दोन इप्सम कंपनीचे काळ्या रंगाचे कलर प्रिंटर जु वा कि अं ४) ५००/ -  रु किं एक डेल कंपनीचा काळ्या रंगाचा किबोर्ड व माऊस जु वा कि अं ५) १००/ -  रु किं एक निळ्या रंगाची कचरा असलेली डस्टबीन जु वा कि अं.एकूण ४५,६००/ - रू किंमत येणे प्रमाणे वरील वर्णनाचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.
        आरोपीवर भा.द.वि.क. 188,269,
270,420,465,466,468 कोविड-19 उपाय योजना 2020 नियम 11 प्रमाणे 2,3,4 आपत्ती व्यवस्थापण 2005 कलम 51(2) प्रमाणे.गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. आर.व्ही. शिंदे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment