Pages

Sunday, June 21, 2020

अवैधरित्या दारू व बियरची वाहतूक! १,१८,६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त! नारायणगाव पोलिसांची कारवाई.

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.२० रोजी खोडद रोड बायपास येथे नाका बंदी दरम्यान देशी दारू व बियरची अवैधरित्या वाहतूक करत असलेल्या  इसमास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अंदाजे १,१८,६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २०/६/२०२० रोजी  नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत सपोनि घोडे पाटील यांच्या सह पोलीस स्टाफ खोडद रोड बायपास जवळ नाकाबंदी करीत असताना नारायणगाव बाजुने एक छोटा हत्ती ( माल वाहू ट्रक) येताना दिसला म्हणून त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पुढे जावून थांबला म्हणून शंका आल्याने  गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या तसेच बिअरच्या बाटल्या चे बॉक्स दिसून आल्याने सदर गाडी व माल पोलीस स्टेशनला घेवून येवून पंचा समक्ष पंचनामा करण्यात आला त्यावेळी एकूण देशी व बिअरच्या बाटल्या असा एकूण २८,६८० / - रू प्रोव्हीजन चा माल व ९०,०००/ - चा छोटा हत्ती नं एम एच १४ डि.एम २०२७ असे माल जप्त केला असून आरोपी नामे लक्ष्मण सुखदेव ढोबळे वय २८ वर्षे रा पारगाव शिंगवे ता. आबेगाव जि.पुणे यांना अटक केली असून त्याचे कडुन एकूण १,१८,६८० / - रू मुद्देमाल जप्त केला आहे 
           सदर कामगिरी मा. दिपाली खन्ना मॅडम उपविभागीय अधिकारी जुन्नर यांच्या मार्गदर्शना खाली अर्जुन घोडे पाटील स.पो.नि. ना. गाव पो. स्टे पो.हवा. काठे, होम राजगुरू यांनी केली

No comments:

Post a Comment