ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
【अध्यक्ष - अ. भा. ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव प्रतिनिधी (दि.२५) नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुकानदाराने नियमांचे पालन केले नाही म्हणून नारायणगाव येथील ३ दुकानदारांवर केले गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दी मध्ये पोलीस स्टाफ रमजान ईद च्या अनुशंघाने पेट्रोलीग करीत असताना मेन बाजार पेठ या ठिकाणी अष्टविनायक कलेक्शन, फ्रेन्डस् मोबाईल शॉपी, सुयोग प्लॅस्टिक या दुकानामध्ये असणारे इसम यांने मास्क न लावता व पाच व पाच पेक्षा अधिक ग्राहकांना त्यांची आरोग्याची कोणतेही काळजी न घेता व त्यांना सॅनिटायझर तसेच हात पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नसल्याने त्या बाबत विचारणा केली असता दुकानदारांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्या मुळे दुकानदार१) धवल सुरेश चव्हाण रा. पिंपळगाव तर्फे ना.गाव ता जुन्नर.जि पुणे ( अष्टविनायक कलेक्शन)
२) सुरज दिनकर अल्हाट रा.ना.वाडी ता जुन्नर जि. पुणे ( फ्रेन्डस् मोबाईल शॉपी)
३) हेमंत शांताराम दहीतुले रा. ना.गाव ता जुन्नर जि. पुणे यांच्यावर प्रचलीत कायदान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. फौ.ढमाले हे करीत आहेत.
ना. गाव पो.स्टे हद्दीमधील सर्व दुकानदार यांना आव्हाहन करण्यात येते की आपल्या दुकानामध्ये काम करणारे कामगार, ग्राहक, इसम यांना मास्क लावणे,सेनीटायझर ठेवणे, हात पाय धुण्यासाठी पाणी ठेवणे या व इतर सुचनाचे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल केले जाईल यांची नोंद घ्यावी. - श्री.अर्जुन घोडे पाटील( सहा. पोलीस निरीक्षक नारायणगाव पो. स्टेशन )
No comments:
Post a Comment