ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दी मध्ये रविवार दि. १२ रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास संचारबंदी चालू असताना विनाकारण फिरणाऱ्या सहा जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली .
घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पोलीस नाईक शिंदे, पोलिस नाईक लोंढे, पो काँन्स्टेबल शेख व घोडे पाटील असे नारायणगावामध्ये पेट्रोलींग करित असताना १) संतोष आनंद वाणी रा. चिंचोली काशिद ता जुन्नर, जि पुणे २) अनिल शिवलाल देसर्गा रा रोज पेटल्स सोसायटी ना.गाव ता जुन्नर जि. पुणे,३) दिपक गुलाबचंद चोरडीया रा रोज पेटल्स सोसायटी खोडदरोड ना.गाव ता. जुन्नर जि पुणे ४) राजेंद्र कांतीलाल लोढा रा. रोज पेटल सोसायटी ता जुन्नर जि पुणे ५) नजीमुद्दीन नसीर शेख रा अनिकेत अपार्टमैन्ट ना. गाव ता जुन्नर जि. पुणे ६) शैलेश बबन जांदेकर रा नारायणगाव अनिकेत अपार्टमेंट ता. जुन्नर जि. पुणे हे संचार बंदीचा आदेश झुगारून विनाकारण फिरताना मिळून आले त्यांना बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता शतपावली करतोय,सहज फिरतोय, असेच आलोय अशी उत्तरे दिल्याने त्यांनी संचार बंदीचा आदेश झुगारून विनाकारण फिरताना मिळून आले म्हणून त्याचे विरूध्द भा.द.वि.का.कलम १८८ , २७९ , २७० तसेच महाराष्ट्र कोविड – १९ विधीयमन २०२० कलम ११ (२) (३) ( ४) आपत्ती व्यवस्थापन अधि.२००५ चे कलम ५१(२) प्रमाणे इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौ. ढमाले ,पो.हवा. कोकणे,पो.ना. कोबल हे करित असुन नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, अत्यावश्यक वस्तु ची खरेदी करण्यासाठी फक्त एक इसमांने बाहेर पडावे, अत्यावश्यक सेवा बाबत फोन करून घरपोच सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे न केल्यास कायदेशिर कारवाई होवून गुन्हे दाखल करण्यात येईल असे घोडेपाटील यांनी सांगितले
No comments:
Post a Comment