Pages

Tuesday, April 14, 2020

गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला नारायणगाव पोलिसांनी केली अटक ; 32 हजार रुपयांची गावठी दारू जप्त

ग्राहक समाचार News Portal

(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक: श्री. अमर भागवत

नारायणगाव दि.१४ पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका टाटा छोटा हत्ती टेम्पो मधून 32 हजार रुपये किमतीच्या गावठी दारूचे चार कॅन व चार ट्यूब घेऊन जात असताना एका आरोपीला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
          याबाबतची फिर्याद पारगाव तर्फे आळे चे पोलीस पाटील हेमंत सिताराम चव्हाण (वय 34 वर्ष) यांनी नारायणगाव पोलिसांना दिली. या घटनेतील आरोपी निलेश गुलाब लोंढे (वय २७ राहणार निमगाव भोगी तालुका शिरूर जिल्हा पुणे) याला मुद्देमालासह आज दिनांक १४ रोजी सकाळी साडेसहा वाजता पारगाव तर्फे आळे येथील एसटी बस स्टँड चौकात अटक करण्यात आली. 

      ,

     या घटनेमध्ये नारायणगाव पोलिसांनी बत्तीस हजार रुपये किमतीचा गावठी दारू चा माल व सुमारे दीड लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो ( क्र. एम.एच. १२ – एस एफ ०५९२) असा एक लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

        आरोपी नीलेश लोंढे याच्यावर भादवि कलम 188, 269, 270 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अ मो.वा. कायदा कलम 66 /1 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 /२ साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम 197 खंड 2 3 4, covid-19 उपाययोजना 20 चे नियम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक राजाराम शिंदे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment