ग्राहक समाचार News : Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक - श्री. अमर भागवत
नारायणगाव | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी चा आदेश असताना देखील नारायणगाव येथील कोठारी व्हील्स हे शोरूम सुरू ठेवून ग्राहकांची गर्दी जमवून त्यांना गाड्यांची विक्री व दुरुस्ती करून देत असल्याने या शोरूमच्या दोन मॅनेजर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
दि 20/03/2020 रोजी स 10.30. वा
नारायणगाव येथे नरेन्द्र शरदचंद्र करंदीकर (असि. जुनरल कोठारी व्हिल्स ) हा प्रवीण दिवेकर (व्हाईस चेअरमन कोठारी व्हिल्स रा . पुणे) यांच्या परवानगीने कोठारी व्हिल्स नावाचे मारुती सुझुकी शोरूम चालू ठेऊन त्यामध्ये लोकांची गर्दी जमवून तसेच आपल्या शोरूम मधील कामगारांना एकत्र जमवून शोरूम मधील गाड्यांची विक्री व दुरुस्ती करीत असताना मिळून आला म्हणून त्याने मा . जिल्हाधिकारी यांचा कार्यालयीन आदेश क्रमांक पुणे क . जि. आ .व्य/का वि/138/2020 या आदेशाचा अवमान केला म्हणून
1) नरेंद्र शरदचंद्र करंदीकर वय 55 वर्षे धंदा असि. जनरलल मॅनेजर कोठारी व्हिल्स,रा वारूळवाडी ता. जुन्नर जि पुणे 2) प्रवीण दिवेकर व्हाईस चेअरमन कोठारी व्हिल्स रा पुणे यांचे विरुद्ध भा. द. वि. कलम 188 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर तक्रार असल्याने दिनेश दत्तात्रय साबळे पोलीस कॉ. नेमणूक नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment