ग्राहक समाचार News /Web Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
नारायणगांव (१ मार्च) सध्याच्या काळामध्ये जितक्या समस्या आहेत त्या सर्वांचे कारण आहे नकारात्मक विचार, नकारात्मक विचारामुळे तनाव वाढतो. तनाव मुक्त होण्यासाठी सकारात्मक विचारांची फार गरज आहे. सकारात्मक विचारामुळे तनाव मुक्त जीवन बनु शकते. अशी माहीती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट आबूहून आलेले ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी सांगितली. नारायणगांव सेवाकेंद्र येथे ते बोलत होते.
ब्र. कु. भगवान भाई म्हणाले की १९ वे शतक हे अन्दाजचे होते, २० वे शतक हे प्रगतीचे आहे, आणि २१ वे शतक हे तनावपूर्ण असेल.अशा तनावपूर्ण परिस्थितितुन बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. त्यांनी सांगितले की मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतील तर विचारांची गती वाढते आणि त्यामुळे मेंदूमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ तयार होऊन आजार वाढतात. मनाच्या नकारात्मक विचारामुळे मनोबल, आत्मबल कमजोर होत जाते. जिथे तणाव आहे तिथे समस्या वाढतच जातात, तनावामुळेच आपापसात मतभेद वाढतात. तणावामुळे मानसिक अशांती वाढते आणि मनुष्य व्यसनाधीन होतो.
तसेच नकारात्मक विचारामुळे मनामध्ये घृणा, तिरस्कार, क्रोध तयार होतो. याच्यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितले की आध्यात्मिक ज्ञान हे सकारात्मक विचारांचा स्रोत आहे. सध्याच्या काळात मनुष्य स्वतःला, पिता परमेश्वराला, कर्माच्या गुह्य गतीला विसरल्यामुळे मुनुष्याच्या मनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून सुध्दा नकारात्मक विचार येऊ लागतात. मनाला सकारात्मक विचारांची दिशा देण्यासाठी स्वतःला आत्मा समजून पिता परमेश्वराची मन बुद्धी ने आठवण करून त्याच्या गुणांचे गुणगान केले पाहिजे तसेच स्वतःविषयी, परिस्थिती विषयी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
स्थानिक सेवाकेंद्र संचालिका बि. के. संगीता बहेनजी यांनी सांगितले की रोज राजयोगाचा अभ्यास आणि सकारात्मक ज्ञान यांच्याद्वारे आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत तणावापासून मुक्त राहू शकतो.
याप्रसंगी नारायणगाव प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वतीने भगवान भाई यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाचे भाई - बहेन व सर्व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment