ग्राहक समाचार ( अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : अमर भागवत
नारायणगाव:येथील सामजिक कार्यात अग्रेसर असणार्या जयहिंद नॅशनल क्लब च्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त्त विविध सांस्कृतिक व भव्य ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन जयहिंद पलेस कार्यालयात करण्यात आल्याची माहिती क्लब चे अध्यक्ष अरविंद लंबे यांनी दिली.
जयहिंद नॅशनल क्लब च्या वतिने प्रतिवर्षी वर्धापनदिन साजरा केला जातो.डान्स स्पर्धेचे हे सलग पंधरावे वर्ष आहे. प्रतिवर्षी या स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळतो. स्पर्धेतील विजेत्या संघांना तसेच सहभागी सर्व संघांना अनेक भव्य बक्षिसे व गिफ्ट व्हाउचर्स तसेच उपस्थित महिला व पुरुष प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू सोडतचेही आयोजन केले आहे.कार्यक्रमास नवनिर्वाचित युवा आमदार अतुल बेनके,लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे ,जयहिंद उद्योग समुहाचे अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ,माजी सभापती शिवाजीराव खैरे,जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जयहिंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष विजय गुंजाळ यांनी दिली.
स्पर्धेची बक्षिसे पुढील प्रमाणे:-
प्रथम क्रमांक:१०००१/-रुपये ,द्वितीय क्रमांक: ८००१/- रुपये ,तृतीय क्रमांक:६००१/- रुपये,चतुर्थ क्रमांक ४००१/-रुपये तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी,गिफ्ट व्हाऊचर,व अनेक वैयक्तिक व सांघिक बक्षिसे. नाव नोंदणी संपर्क:जयहिंद पतसंस्था मो.नं.९९६०५३४९२७
No comments:
Post a Comment