Thursday, December 31, 2020

नारायणगाव पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा चोरट्यांचा ए टी एम फोडण्याचा प्रयत्न फसला!दोघांना रंगेहात पकडले

        नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन ची चोरी करत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला त्यामुळे एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.तद्नंतर दि 30 रोजी रात्रीच्या सुमारास बस स्थानका समोरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि के गुंड यांनी दिली.    
              सध्या पुणे जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी ए.टी.एम. चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे  हद्दीमधील रात्र गस्त अधिकारी कर्मचारी यांनी जास्त लक्ष हे ए.टी.एम.व बंद फ्लॅट मध्ये चोरी होवू नये या वर ठेवण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी याबबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दि.३०/१२/२०२० चे सेक्टर आधिकारी पो.स.ई हिंगे, पो स्टे चे  पोलीस नाईक दिनेश साबळे , पो.ना. शेख, होम ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे असे रात्र गस्त व ए.टी.एम चेक करत असताना होमगार्ड ठोबळे, पठाण यांना एस.बी.आय.ए.टी.एम मध्ये दोन इसम हे सदर मशीन चे शटर अर्धलावून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते लागलीच प्रसंगावधान राखून होमगार्ड ठोबळे व पठाण यांनी शटर खाली ओढुन बंद केले. त्याच दरम्यान आतील इसमाने त्यांच्या कडील लोखडी टॉमी ने होम. ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.
           सदरबाबत  सहा.पो.निरीक्षक श्री. गुंड यांना माहिती देवुन लागलीच पो.स.ई हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होम ढवळे, खंडे पो.मित्र भरत मुठे, ईश्वर पाटे ऋषिकेश कुंभार व इतर २० ते ३० असे सदर ठिकाणी जमा झाले. 
          सदर  चे आरोपी हे सराईत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची शक्यता असल्याने सुरक्षीततेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन पो.ना.लोंढे,पो ना साबळे,पो.कॉ वाघमारे, कोबल यांनी शटर वर करून सदर आरोपीना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव १) राहूल वसंत सुपेकर मुळ रा निघोज पठारवाडी ता. पारनेर, जि नगर सध्या रा रांजणगाव एम.आय.डी.सी.२) बाजीराव बाळासाहेब नागरगोजे मुळ रा चिंचपुर ता पाथर्डी जि नगर सध्या रा रांजणगाव ता शिरूर जि पुणे* यांना ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशन गु.र.नंबर  ४१६/ २०२० भा.द.वि कलम ३५३,३३२,३८०,४२७, ५११,३४ वगैरे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स.ई. हिंगे हे करत आहे
         सदर कामगिरी हि मा.आभिनव देशमुख सोा,पोलीस अधिक्षक , मा.विवेक पाटील सो, अपर पोलीस अधिक्षक,मा. मंदार जवळे सोा उपविभागीय पो. अधिकारी सोा यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गुंड स.पो.नि ना.गाव पो स्टेशन , पो.स.ई हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होम ढवळे, खंडे यांनी केली आहे

Sunday, December 27, 2020

सराईत गुंड गावठी पिस्तूल सह ताब्यात!पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाची कारवाई


   पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सुचनेनुसार दिनांक २६/१२/२०२० रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह कामशेत पवना नगर हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे राजेंद्र मिरघे यांना बातमीदारा द्वारे  मिळालेल्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतून आतिश बलदेव कोरी राहणार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे  वय २१ वर्ष यास  ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व  जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याच्यावर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                  सदर आरोपीवर यापूर्वी दरोडा चोरी मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
               सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक  विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत, पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी कामशेत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्ष चे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, राजेश पवार, विश्वास खरात पोलीस हवालदार  राजेंद्र मिरघे, अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे ,किरण  कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने केली.

Friday, December 25, 2020

फॉरेस्टच्या जंगलात जुगार अड्डयावरआळेफाटा पोलिसांचा छापा! १२ जुगाऱ्यांवर कारवाई!६५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

                          आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फॉरेस्ट च्या जंगलात अवैधरित्या पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या १२ जणांवर आळेफाटा पोलिसांनी छापा टाकून कारवाई करून त्यांच्याकडून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एम.ए.पवार यांनी दिली.
                       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक 
एम.ए.पवार यांना खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की , मौजे आळे खापरवाडी साकुरची खानावळ मागे कळमजाई माता मंदिराकडे जाणारे रोडवर फॉरेस्टच्या जंगलात डोंगराच्या कडेला काही इसम स्वता:च्या फायदयाकरीता पत्यावर पैसे लावुन जुगाराचा खेळ खेळत असल्याची खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. .    
              सदर छाप्याच्या कामी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच आळेफाटा पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावुन पत्याचे पानावर जुगार खेळताना छापा घातला त्यामध्ये  १ ) मारुती बबन गुंजाळ , वय ४० वर्षे , रा . आळे , ता . जुन्नर , जि . पुणे . २ ) उमेश मुक्ता गोफणे ,वय ४५ वर्षे , रा .आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ३ ) दिनेश दगडु शिरतर , वय ३० वर्षे , रा.आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ४ ) नसिर अहमद पठाण , वय ३८ वर्षे , रा . धारगाव ता . संगमनेर , जि . अ . नगर , ५ ) गजानन बाबुराव इंगोले , वय ३६ वर्षे , रा . आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ६ ) सुभाष ज्ञानदेव मुसळे , वय ४० वर्षे , रा . शुभम तारांगण , आळेफाटा , ता . जुन्नर , जि . पुणे , ७ ) विश्वनाथ बबन फावडे , वय ४३ वर्षे , रा . बेल्हे , ता . जुन्नर , जि . पुणे , ८ ) रंगनाथ चिंतामण काळे , वय ५० वर्षे , रा . खोडद , ता . जुन्नर , जि . पुणे , ९ ) दत्तात्रय सदाशिव फापाळे , वय ५० वर्षे , रा . जाचकवाडी , ता . संगमनेर , जि . अ.नगर १० ) सुनिल बन्सी कु-हाडे , वय ३४ वर्षे , रा . आगरमळा , आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ११ ) दिनेश पोपट गुंजाळ , वय ३० वर्षे , रा . आळेफाटा , ता . जुन्नर , जि . पुणे , १२ ) महेश नानासाहेब शेळके , वय ३० वर्षे , रा . शेळकेमळा , बोटा , ता . संगमनेर , जि . अहमदनगर हे  पत्त्यांच्या पानावर पैसे लावून जुगार खेळताना मिळुन आले असुन त्यांच्या ताब्यात जुगार खेळाची रोख रक्कम ४१८६० / -रु तसेच पत्त्यांची पाने व मोबाईल अशी एकुण ६५,०६० / -रु रक्कम जुगार छाप्याचे कामी मिळुन आली आहे . 
                 सदर आरोपीत यांच्या विरुध्द आळेफाटा पोलीस ठाणे गु.र.नं. ४४४/२०२० मु.जु.का.कलम १२( अ ) प्रमाणे गुन्हां रजि नोंद करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढिल तपास एन.आर.कारखेले  हे करीत आहेत . 
               सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एम.ए.पवार ,पो.कॉ.फलके , पो.कॉ. इष्टे,पो.कॉ.ढोबळे,
पो.कॉ कुलकर्णी यांनी केली.

Sunday, December 20, 2020

नारायणगावातील सराईत मोटार सायकल चोरांकडून २४ मोटार सायकली जप्त!१४ गुन्हे उकडकीस! LCB पुणे ग्रामीण ची दमदार कामगिरी

           आज दिनांक २०/१२/२०२० रोजी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १७/१२/२०२० रोजी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील केलेल्या कारवाईतील मुख्य आरोपींचा व इतर सुत्रधारांचा शोध घेत असताना स्था.गु.शा. पुणे ग्रामीण च्या खेड-जुन्नर पथकाला सदर गुन्हयातील मुख्य आरोपी आशिश बेल्हेकर हा नारायणगाव एस. टी. स्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या नुसार  स्था.गु.शा. पुणे (ग्रा) टीम ने नारायणगाव  एस.टी स्टॅन्ड येथे मुख्य आरोपीस सापळा  रचून ताब्यात घेतले.
             ताब्यात घेण्यात आलेल्या  आरोपीचे नाव 1) आशिष सुनील बेल्हेकर वय २८ वर्ष. रा. नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे असे आहे. त्याच्या कडे असणाऱ्या मो.सा.ची त्याचेकडे चौकशी केली असता सदर मोटार सायकल या त्याचा मित्र पवन दत्तात्रय शेजवळ वय ३३ रा.नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे याच्या मदतीने नारायणगाव व जुन्नर परीसरातुन चोरुन आणलेल्या असल्याचे समजले सदर बाबत संबधीत पो.स्टे.कडे खात्री करता त्या  बाबत गुन्हे दाखल असल्याचे समजले तरी सदर संशयित इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खाली नमुद चोरी केलेल्या व विक्री करण्या करीता जवळ बाळगलेल्या एकुण ११ मोटार सायकली किंमत अंदाजे ३लाख ६ हजार रु. किंमतीच्या मोटार सायकली काढुन दिल्या त्या सर्व मोटार सायकली जप्ती पंचनाम्याने जप्त करुन आरोपी व जप्त मुददेमाल  नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील कार्यवाही करीता दिलेल्या आहेत.    
            सदर कार्यवाहीत खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणले आहेत. 
१) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं.     403/2020 भा.द.वि.क. 379  
२) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 378/2020 भा.द.वि.क. 379
३) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 404/2020 भा.द.वि.क. 379
४) जुन्नर पो.स्टे. गु.र.नं. 308/2020 भा.द.वि.क. 454,457,380
५)घरगाव पो.स्टे. अहमदनगर 
  गु. र.न  391/2020भा.द.वी.  
  389
          सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या साथीदाराकडून दि.१७ रोजी १३ मोटारसायकली जप्त करून ९ गुन्हे उघडकीस आणले होते.त्यानंतर आज दि.२० रोजी वरील ५ गुन्हे उघडकिस आणून  ११ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
             सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख, उप.विभा.पो.अधिकारी मंदार जवळे. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशाने व सुचने नुसार                                      स.पो.नि. एन. एस. गंधारे      
पो.हवा. विक्रम तापकीर 
पो .हवा. हनुमंत पासलकर
पो.ना. दिपक साबळे
पो.कॉं. संदिप वारे.
पो.काँ. निलेश सुपेकर. 
पो.हवा. सचिन गायकवाड
पो.ना. राजु मोमीन 
पो.कॉ. बाळासाहेब खडके
पो.काॅ. अक्षय जावळे 
प्रसाद पिंगळे पोलीस मित्र यांच्या पथकाने केली आहे.

Friday, December 18, 2020

युवा नेते गणेश कवडे यांना राज्यस्तरीय “युवारत्न पुरस्कार” जाहीर ! राज्यपाल व राज्यातील दिग्गज् मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार संपन्न!

युवा नेते गणेश कवडे यांना राज्यस्तरीय “युवारत्न पुरस्कार” जाहीर ! राज्यपाल व राज्यातील दिग्गज् मान्यवरांच्या उपस्थितीत  पुरस्कार प्रदान सोहळा होणार संपन्न!
     शिर्डी | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “ मान नेतृत्त्वाचा सन्मान कर्तृत्वाचा "हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि .२२ जानेवारी २०२१ रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्याला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांसह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.      
           यंदाचा “ मान नेतृत्त्वाचा सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय “ युवारत्न ”  पुरस्कार जुन्नर तालुक्यातील ओझर गावचे सुपुत्र युवासेना पुणे जिल्हा प्रमुख व श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्थ तसेच अश्वमेघ युवा मंच महा.राज्याचे संस्थापक मा.श्री.गणेश जगन्नाथ कवडे यांना जाहीर झाला आहे.अशी माहिती संस्थापक बाबासाहेब पावसे (संगमनेर)यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
           सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान नेतृत्त्वाचा सन्मान कर्तृत्वाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शासकीय नियमानुसार संपन्न होणार असून  यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान चिन्ह, शाल, सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्याचा मानस आहे.
         या वेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक दिग्गज मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
            यावर्षीचे राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श गांव,आदर्श सरपंच,शैक्षणिक,
सामाजिक,राजकिय ,क्रिडा,विधी न्याय,लोक कलावंत,सहकार , युवारत्न,कृषी व्यापार,
उघोगभुषण , अध्यात्मिक, ऐतिहासिक,
प्रशासकीय अधिकारी यांच्या सह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येणार आहेत.
          यावेळी पुरस्कारार्थी मान्यवरांच्या परीचय पत्रिकेचे प्रकाशन तसेच पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,झी २४ तास चे संपादक विजयराव कुवळेकर , महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशध्यक्ष महसुलमंत्री ना बाळासाहेब थोरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ , समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर आदर्श गाव योजनेचे कार्यध्यक्ष पोपटराव पवार , कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश चिलबुले , श्री गृह उद्योग लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते , प्रसिध्द डोळे तज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने , राज्य ग्रामसेवक युनियनचे प्रदेशध्यक्ष एकनाथराव ढाकणे, मानदअध्यक्ष लक्ष्मण सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
        हा सोहळा शासकीय नियमानुसार हाँटेल शांती परीसर शिर्डी ता.राहाता जि. अहमदनगर येथे संपन्न होणार असून या सोहळ्याला उपस्थित रहावे. अशी विनंती संस्थापक यादवराव पावसे आदर्श सरपंच शंकरराव खेमनर , अँड भाऊसाहेब गुंजाळ , नवनाथभाऊ शिदे , रविंद्र पवार , सौ भाग्यश्री नरवडे , पंकज चव्हाण , गणेश तायडे , रविराज गाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Thursday, December 17, 2020

पुणे ग्रामिण LCB यांची कामगीरी! मोटार सायकल चोरीचे ९ गुन्हे उघड व १३ मोटार सायकली जप्त.

    आज दि.17 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख यांजकडून दरोडा,जबरी चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्या करीता मार्गदर्शनपर सुचना देण्यात आल्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पुणे ग्रामीण चे खेड-जुन्नर पथक हे आज दिनांक 17/12/2020 रोजी सदर गुन्हे उघड आणण्या करीता स्था.गु.शा. पुणे ग्रामिण चे जुन्नर खेड पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि एक इसम मोटार सायकल चोरीतील मोटार सायकल विक्री करण्या करीता पारगाव तर्फे आळे येथे येणार आहे त्या अनुषंगाने पारगाव तर्फे आळे येथे जावुन सापळा रचुन दोन संशयीत इसम व त्यांच्या कडील मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत.
       याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे 1) सचिन बाळु दिघे वय 31 वर्ष. रा. ढगेवाडी, पळसपुर ता. पारनेर जि. अहमदनगर व 2) ऋशीकेष किसन दरेकर वय 20 वर्ष. रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर जि. पुणे. अशी आहेत.
         आरोपींकडे असणाऱ्या मोटारसायकलची चौकशी केली असता सदर मोटार सायकल या आळेफाटा व नारायणगाव परीसरातुन चोरुन आणलेल्या असल्याचे समजले सदर बाबत संबधीत पोलीस स्टेशनकडे खात्री करता त्या बाबत गुन्हे दाखल असल्याचे समजले तरी सदर संषयीत इसमांकडे सखोल चैकषी केली असता त्यांनी त्यांचा मित्र अशिष बेल्हेकर  (पत्ता माहिती नाही). याच्या मदतीने चोरी केलेल्या व विक्री करण्या करीता जवळ बाळगलेल्या एकुण 13 मोटार सायकली किंमत अंदाजे 3,05,000/- रु. किंमतीच्या मोटार सायकली काढुन दिल्या त्या सर्व मोटार सायकली जप्ती पंचनाम्याने जप्त करुन आरोपी व जप्त मुद्देमाल  नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील कार्यवाही करीता दिलेल्या आहेत.      

       सदर कार्यवाहीत खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणले आहेत. 
१) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 399/2020 भा.द.वि.क. 379  
२) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 397/2020 भा.द.वि.क. 379
३) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 398/2020 भा.द.वि.क. 379
४) आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. 409/2020 भा.द.वि.क. 379
५) आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. 350/2020 भा.द.वि.क. 379
६) आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. 418/2020 भा.द.वि.क. 379
७) अकोले अ.नगर पो.स्टे. गु.र.नं. 735/2020 भा.द.वि.क. 379
८) अकोले अ.नगर पो.स्टे. गु.र.नं. 708/2020 भा.द.वि.क. 379
९) अकोले अ.नगर पो.स्टे. गु.र.नं. 685/2020 भा.द.वि.क. 379
येणे प्रमाणे वरील ९ गुन्हे उघडकिस आणलेले आहेत.
             सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख, उप.विभा.पो.अधिकारी. मंदार जवळे. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट. यांच्या आदेशाने व सुचने नुसार             स.पो.नि. एन. एस. गंधारे ,पो.हवा. विक्रम तापकीर ,पो.ना. दिपक साबळे. ,पो.कॉं. संदिप वारे. ,पो.काँ. निलेश सुपेकर. ,पो.काँ. दगडु विरकर. ,पो.हवा. सचिन गायकवाड.,पो.हवा. पासलकर,पो.ना.राजु मोमीन ,पो.काॅ. अक्षय नवले. यांनी केली आहे.

Monday, December 14, 2020

येडगाव धरणात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला



               नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येडगाव धरणामध्ये गेट क्रमांक ३ जवळ दिनांक १२/१२/२०२० रोजी सकाळी १०:00 वा.च्या पुर्वी (नक्की वेळ माहीत नाही ) अंदाजे ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असुन तिचे वारस व नातेवाईकांचा आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला असता अदयापही मिळून आले नाहीत सदर मयत महिलेचे मिसींग अगर वारस / नातेवाईक कोठे मिळून आल्यास तत्काळ नारायणगाव पो.स्टेशन येथे ०२१३२ २४२०३३, प्रभारी अधिकारी मो.न.९६५७७१७२८८ यांच्याशी संर्पक साधावा अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिली आहे.
                   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेचे वर्णन डोक्याचे केस काळे असुन रंग सावळा आहे,अंगात नेसणीस चॉकलेटी काळपट रंगाचा कुर्ता व कर्त्यावर रंगेबेरंगी ठिपके दिसत असुन,सफेद रंगाची लेगीज दिसत आहे,तसेच उजव्या हातामध्ये लाल रंगाचा धागा व डाव्या हातामध्ये एक काचेची बांगडी दिसत आहे तसेच सदरचे प्रेताचा चेहरा हा जलचर जीवांनी खाल्लेला दिसत आहे ,

Tuesday, December 8, 2020

राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार बाबू भाऊ पाटे यांना जाहीर!राज्यपालांच्या उपस्थितीत ६ जानेवारीला पुरस्कार प्रदान सोहळा होणार संपन्न!

                 सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय “ मान नेतृत्त्वाचा सन्मान कर्तृत्वाचा " पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि .६ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १ वा.शिर्डी येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्याला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांसह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार नारायणगाव चे लोकनियुक्त सरपंच योगेश ऊर्फ बाबूभाऊ पाटे यांना जाहीर झाला आहे.अशी माहिती संस्थापक बाबासाहेब पावसे (संगमनेर)
यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
                     संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर कार्यरत राहुन सरपंच यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यावर सरकार सोबत सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्रात एक आगळावेगळा उपक्रम राबवून सरपंच यांना एक आधार म्हणून सरपंच सेवा संघ कार्य करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रभर सरपंच बैठका, सरपंच मेळावे आयोजित करून सरपंच यांच्या अधिकार कर्तव्य सर्व सामान्य माणसाला आधार देण्याचे काम सातत्याने सरपंच करीत असतात यांचा मान उंचावण्यासाठी सरपंच सेवा संघ प्रयत्नशील आहे. सरपंच सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रभर तालुका, जिल्हा विभाग,राज्य स्तरावर संघटन  कौशल्य मजबुत आहे. यासाठी संघटनेचे  संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र काम सुरू आहे तसेच अध्यक्ष सरपंच भाऊ मरगळे  यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गावे निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करून महाराष्ट्रात काही गावे निवडुण ग्रामविकासाचे काम गावोगावी जाऊन सुरू करणार आहे.
      यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार . आदर्श  सरपंच , उघोग भुषण , पत्रकारीता . युवारत्न , प्रशासकीय सेवा , सामाजिक ,  शैक्षणिक , कोरोणा योध्दा , मिडीया, कृषी  व्यापार , कला , राजकीय , महसुल , वैद्यकीय , अध्यात्मिक , ऐतिहासिक , दिव्याग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
               यावेळी पुरस्कार सन्मानित मान्यवरांच्या परीचय पत्रिकेचे प्रकाशन होईल. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी , झी २४ तास चे संपादक विजयराव कुवळेकर , महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशध्यक्ष महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात ,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ , समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर ,आदर्श गाव योजनेचे कार्यध्यक्ष पोपटराव पवार , कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश चिलबुले , श्री गृह उघोग लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते , प्रसिध्द डोळे तज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने , राज्य ग्रामसेवक युनियनचे प्रदेशध्यक्ष एकनाथराव ढाकणे मानदअध्यक्ष लक्ष्मण सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत.
        हा सोहळा शासकीय नियमानुसार हाँटेल शांती परीसर शिर्डी ता.राहाता जि. अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित रहावे अशी विनंती संस्थापक यादवराव पावसे आदर्श सरपंच शंकरराव खेमनर , अँड भाऊसाहेब गुंजाळ , नवनाथभाऊ शिदे , रविंद्र पवार , सौ भाग्यश्री नरवडे , पंकज चव्हाण , गणेश तायडे , रविराज गाटे , यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
            सुत्रसंचलन श्री बाबासाहेब मेमाने सर , निलेश पर्बत इंजि युवराज सातपुते मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होईल

Monday, December 7, 2020

वळसे पाटील महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

              
(निमगाव सावा ता. जुन्नर )दि.६ डिसेंबर
               श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  74वा महापरिनिर्वाण दिन साजरा  करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सदस्य व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन 
 करण्यात आले.                  
               यावेळी त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. पुढे बोलताना ते म्हणाले डॉ. आंबेडकर हे न्यायशास्र, अर्थशास्त्र, राजनीती, समाजसुधारक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या बाबासाहेबानी भारतीय संविधानानाची निर्मिती करून देशासाठी बहुमोल कार्य केले. सध्या कोरोना सदृश परिस्थिती असल्याने सर्व नागरिकांनी घरातून आंबेडकर जयंती साजरी करावी असा संदेश जनतेला दिला.    
                   यावेळी  रंगनाथ गाडगे प्रा. प्रल्हाद शिंदे, श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत गाडगे, प्रा. शिवाजी साळवे,  वैभव घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

निमगावसावात ६ जुगारींवर नारायणगाव पोलिसांची कारवाई

                   नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात निमगावसावा गावच्या हद्दीमध्ये ६ इसम तीन पत्ती नावाचा जुगार पैशावर खेळत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिली.
               याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई  दिनेश दत्तात्रय साबळे यांनी दिली आहे.
               आरोपींची नावे १) बबन अण्णा गायकवाड २ ) मुनीर मोहम्मद पठाण३) सचिन पांडुरंग जावळे ४) मारुती विलास गायकवाड.
सर्व राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे  ५) सुनील सावळेराम गायकवाड राहणार साकुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे ६) दिनकर भाऊ जाधव रा शिरोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे अशी आहेत.
               अधिक माहिती अशी की, दि.
06/12/2020 रोजी 19/00 वा.च्या सुमारास मौजे निमगाव सावा येथील खंडोबा मंदिराच्या पायथ्या लगत ऊसाच्या शेतीच्या कडेला बाबळीच्या झाडाच्या आडोशाला सदर आरोपी हे तीन पत्ती नावाचा जुगार पैशावर खेळत असताना मिळून आले आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 20500/-रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



Friday, December 4, 2020

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जुन्नर तालुका काँग्रेसचा पाठिंबा.

      ∆ केंद्र सरकारच्या विरोधात नायब तहसिलदार यांना निवेदन देताना सत्यशिल शेरकर, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
    ( शिरोली बु.) - केंद्र सरकारने लोकसभा व राज्य सभेमध्ये शेतकरी (सक्षमीकरण आणि सरंक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० आणि कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० मंजूर केले आहे. तसेच केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात ही बदल केलेला आहे.
             सदर कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार जुन्नर तालुका काँग्रेस कमिटीने सदर कायद्याच्या विरोधात जुन्नरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी निवेदन स्विकारले आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.
         यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी तथा विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, या कायद्यामुळे बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि शेतीमध्ये अपार कष्ट करीत असलेल्या बळीराजाला हद्दपार करतील अशी भिती सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकरी, कामगार विरोधी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सदर कायद्यात तात्काळ बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करावेत.
             यावेळी तालुकाध्यक्ष अशोक घोलप, सुरेश गडगे, तबाजी शिंदे, कुंडलिक शिंदे, प्रकाश जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश खंडागळे, उपाध्यक्ष राहुल जाधव, आनंद औटी, भानुदास पानसरे, मार्तंड मांडे, राजेंद्र शेळके, संदीप शिंदे व काँग्रेस पक्षाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नारायणगावात पूर्व वेशिजवळ स्थानिक इसमाकडून गावठी रिव्हॉल्व्हर हस्तगत!कोण आहे आरोपी वाचा सविस्तर बातमी!

   
              दि.४ डिसेंबर २०२० रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव येथील पूर्व वेशिजवळ एका स्थानिक इसमाकडून सापळा रचून गावठी रिव्हॉल्व्हर हस्तगत करून सदर आरोपीस ताब्यात घेतले आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिली.
         दिनांक ४/१२/२०२० रोजी  नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री डी के गुंड  यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की नारायणगावमध्ये खेबडे  वडापाव  समोर चौकामध्ये एक इसम गावठी बनावटीचा रिव्हॉल्व्हर घेऊन येणार आहे असे सांगितले असता लागलीच पोलीस कॉस्टेबल दिनेश साबळे, पो.कॉ. सचिन कोबल, पो.हवा टाव्हरे, पो.कॉ. दुपारगुडे ,पो.कॉ. जायभाये, पो.ना. शेख यांना खाजगी वाहनाने जाण्यास सांगितले साधारण ०८:४५ वाजता एक इसम हा चौकामध्ये आला त्याच्या हालचाली या संशयास्पद वाटल्याने लागलीच पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साबळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी त्याला जागीच पकडले.
      सदर पकडलेल्या इसमाकडे अधिक चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याचे नाव पत्ता विचारले त्याने त्याचे नाव नंदकुमार बाळासाहेब साळुंके रा.नारायणगाव टेलिफोन कार्यालय समोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्यावेळी तो कावराबावरा होऊन त्याने खिशात हात घालून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करू लागला म्हणून  त्याचा संशय आल्याने सोबतच्या पंचांसमक्ष त्यास त्याची अंग झडती  घेतली असता त्याच्याकड़े खालील वर्णनाचा एक गावठी बनावटीचा रिवाल्वर मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे २०,०००/- रू किमतीचा गावठी बनावटीचा रिव्हॉल्व्हर त्यात सहा होलचे मॅक्झिन त्याची लांबी २० सेंटीमीटर ०९ मिली तसेच बॅरलची लांबी ०८ सेंटीमीटर २ मिली तसेच स्ट्रेगर तसेच लोखंडी व लाकडी बट असलेली मिळून आल्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे.
        सदर आरोपी नंदकुमार बाळासाहेब साळुंके रा.नारायणगाव ता जुन्नर जि पुणे हा बेकायदा बिगर परवाना आपले कब्जात २०,०००/- रू .किं गावठी कट्टा रिव्हॉल्वर सह मिळून आल्याने पो.कॉ दिनेश दत्तात्रय साबळे यांनी फिर्याद दिली आहे.
            सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस कॉ. दिनेश साबळे, पो.कॉ सचिन कोबल, पो.कॉ. संतोष दुपारगुडे, पो.कॉ. शाम जायभाये यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के डी ढमाले हे करीत आहे.

Wednesday, December 2, 2020

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या विश्वनाथ लॉजवर नारायणगांव पोलिसांची करवाई


               नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नारायणगाव बस स्थानका समोरवेश्याव्यवसाय
चालवणाऱ्या विश्वनाथ लॉजवर दि.२ रोजी नारायणगाव पोलिसांनी छापा टाकला असून सदर लॉज चे चालक वडील व मुलगा यांच्या सह एकाला ताब्यात घेतले आहे व त्यांच्यावर पिटा व प्रचलीत कायदयान्वये कारवाई केली आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिली. 
                पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बस स्थानकासमोर  विश्वनाथ 
लॉज येथे लॉज चालक  १) अशोक हृदयनारायण तिवारी २) गौरव अशोक तिवारी हे कैलास नामदेव वाबळे यांच्या मदतीने सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवून स्वतःची उपजिविका करत आहे अशी बातमी दिनांक 2/12/2020 रोजी सपोनि डि.के. गुंड यांना गुप्त माहिती दारा मार्फत मिळाली होती.सदर बातमीची दखल घेत सपोनि डि के गुंड यांनी या बातमीचा आशय  उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर श्री मंदार जवळे यांना कळविला सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत श्री. जवळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर छापा
कारवाईसाठी पोलीस स्टाफ, पंच व बनावट गिऱ्हाईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून छापा कारवाई साठी रवाना केले.
          सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक यांनी जाऊन वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली त्याप्रमाणे कैलास वाबळे यांनी वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्यांच्याकडून विश्वनाथ लॉज चे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी यांनी एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी सो मंदार जावळे यांनी व पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारी पीडित दोन महिला यांना ताब्यात घेऊन लॉजचे चालक अशोक तिवारी , गौरव तिवारी यांना ताब्यात घेतले आहे आहे.
         सदर आरोपी १) अशोक हृदयनारायण तिवारी २) गौरव अशोक तिवारी रा. विश्वनाथ लॉज नारायणगाव ता जुन्नर जि. पुणे ३) कैलास नामदेव वाबळे रा वडगाव सहाणी ता. जुन्नर जि. पुणे यांच्या विरूध्द पो.कॉ. योगेश दामोदर गारगोटे यांनी फिर्याद दिली असून पिटा व प्रचलीत कायदयान्वये पुढील अधिक तपास चालु आहे.
         सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जावळे,  सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक हिंगे, व नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी के गुंड हे करीत आहेत.

Sunday, November 29, 2020

जनतेने संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेस सहकार्य करावे - डॉ. उमेश गोडे

दिनांक 1 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी भेट देणार आहेत व जे काही संशयित सापडतील त्यांची कुष्ठरुग्ण व क्षय रुग्णांसाठी तपासणी करण्यात येणार आहे तरी जनतेने या मोहिमेसाठी सहकार्य करावे अशी घोषणा डॉ.उमेश गोडे( जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी) यांनी केली आहे. 

◆ खालीलपैकी कोणतीही लक्षणे असल्यास संशयित रुग्ण समजावा.
दोन आठवड्याचा खोकला.
भूक न लागणे .
वजनात घट.
मानेवर गाठी येणे.
रात्रीचा हलकासा ताप.

◆ खालीलपैकी कोणतेही लक्षणे असल्यास संशयित कुष्ठरुग्ण समजावा 
न खाजणारा,न दुखणारा फिक्कट,पांढुरका किंवा लालसर चट्टा.
 हात-पायाच्या मज्जा जाड किंवा दुखऱ्या  असणे.
हाता पायाला सतत मुंग्या येणे.
चेहरा तेलकट व चकाकणारा असेल तर कुष्ठरोग असू शकतो.

Saturday, November 28, 2020

महात्मा फुले विचार मचं जुन्नर तालुका अध्यक्षपदी श्री.आत्माराम संते यांची नियुक्ती

                
नारायणगाव - महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका अध्यक्षपदी वारुळवाडी ग्रामपंचयतीचे माजी सरपंच आत्माराम संते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.येथील कलासागर मंगल कार्यालयात "महात्मा फुले विचार मंच" जुन्नर तालुका कार्यकारणी आणि वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि महात्मा फुले युवा मंचचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
          याप्रसंगी नुकत्याच पुणे जिल्हा समता परिषदेच्या अध्यक्षपदी निलेश भुजबळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
           महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका च्या मागील वर्षी आत्माराम संते यांना अध्यक्ष पदावर काम करताना कोरोना महामारी संकटकाळात समाजाचे काम करण्यास अत्यंत कमी वेळ मिळाला. त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात कमी वेळ मिळूनही उत्कृष्ठ काम संघटनेसाठी झाले.उत्कृष्ठ संघटन आणि सर्वसंमतीने घेतलेले निर्णय या मुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षी पुन्हा संधी मिळावी व कार्यकारणी जैसे थे ठेवावी असे मत अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी जाहीर मांडले होते.यामुळे श्री संते यांची अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली.
         यावेळी उपाध्यक्ष सचिन वऱ्हाडी,प्रसिद्धी प्रमुख हेमंत डोके,जेष्ठ मार्गदर्शक एम. डी. नाना भुजबळ,संदीपशेठ नाईक,अँड.हेमंत भास्कर,योगेश डोके,जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे,काशीनाथ लोखंडे,बाळासाहेब विधाटे, ज्ञानेश्वर कोल्हे,आशिष फुलसुंदर,बाळासाहेब भुजबळ,राहुलशेठ बनकर,विपुल फुलसुंदर,जालिंदर,कोल्हे,संजय कानडे,ग्रामपंचयात सदस्य राजेंद्र मेहेर,महेंद्र मेहेर,राजेंद्र संते,भरत नाईक,सुभाष डोके,शिवदास विधाटे,अनिल घोलप,अशोक गडगे, बारकू गडगे, भानुदास खराडे,नितिन भुजबळ आणि मंडलिक सर. उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी तर आभार संस्थापक डी.एल.मस्के सर यांनी मांनले!

Tuesday, November 24, 2020

जुन्नर पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करणार - खा.डॉ.अमोल कोल्हे

जुन्नर पर्यटन विकास संस्थेकडुन विविध मागण्या ...
जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने पर्यटन विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन 
शिरुर लोकसभेचे खासदार डाॅ अमोल कोल्हे  यांना देण्यात आले. या प्रसंगी जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे आजपर्यंतचे उपक्रम, तसेच भविष्यात, जुन्नर पर्यटन विकासाच्या विविध योजनांची माहिती आणि  "जुन्नर पर्यटन मॉडेल" चे सादरीकरण संस्थापक श्री मनोज हाडवळे यांनी केले. 
           तालुक्यातील विविध गावातील पर्यटन स्थळे निश्चित करुन तेथे पार्किंग लॉट, पिण्याच्या पाण्याची सोय ,शौचालय सुविधा, दिशादर्शक फलक,माहिती फलक,जुन्नर पर्यटन नकाशा लावण्यासाठी मागणी करण्यात आली. 
          तसेच आदिवासी विकास आणि पर्यटन विभागाचे वतीने  होम स्टे, लोक कला संवर्धन करण्यासाठी विविध महोत्सव, गाईड प्रशिक्षण, आदरातिथ्य,कलाकुसर प्रशिक्षण देण्यात यावे.यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली. 
        शिवजयंती महोत्सव हा राज्यातील सर्व शिवप्रेमींना आकर्षित करण्यासाठी 7 दिवस आयोजित करुन त्यामध्ये हेरीटेज वाॅक ,लोककला  प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, शालेय आणि खुला गट विविध स्पर्धा,  स्थानिक बचत गटाच्या उत्पादन प्रदर्शन, खाद्य संस्कृती सफर,  मॅरेथॉन रन, सायकल स्पर्धा  आयोजित  करुन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित करता येतील.   यासाठी प्रयत्न व्हावे अशी  मागणी यावेळी केली . 
जुन्नर पर्यटन विकासासाठी बहुउद्देशिय सभागृह,तालुका क्रिडा संकुल, पर्यटन निवास  याबद्दल  पाठपुरावा व्हावा अशी विनंती ही शिष्टमंडळाकडुन  करण्यात आली. 
              या वेळी बोलताना डाॅ. अमोल कोल्हे म्हणाले, "जुन्नर पर्यटन विकास संस्थेने केलेल्या सर्व मागण्या स्तुत्यच आहेत.
त्या पूर्ण करण्यासाठी  शिव-संस्कार-सृष्टी आराखडा बनवण्याचं काम चालु आहे, यामध्ये बहुतेक बाबी समाविष्ट करण्यात येतील.
जास्तीतजास्त पर्यटन विकासासाठी महामार्ग मजबूतीकरण, बाह्यवळण रस्ते, पुणे नाशिक रेल्वे, व ईतर प्रकल्प हाती घेतले आहेत. ते लवकरच पुर्ण होणार आहेत. 
जुन्नर तालुका हा पुणे, नाशिक, मुंबई आणि अहमदनगर  या चार मोठ्या शहरांपासुन सारख्या अंतरावर आहे.हा सुवर्ण चतुष्कोण गृहित धरून  
"पर्यावरण पुरक रहिवासी झोन" म्हणून विकसित करण्याचा विचार  व्यक्त केला.
 भिमाशंकर ते भंडारदरा हा ट्रेक रुट स्वतः करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे निसर्ग प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्थानिक गरजू तरुणांना गाईड म्हणून सेवा देता येईल. आपली 10 वर्षांपासून सुरू झालेली जबाबदार जुन्नर पर्यटन चळवळ ,"जुन्नर पर्यटन मॉडेल" म्हणून  ओळखली जाऊ लागली आहे. 
जुन्नर तालुक्यातील जलाशयांमध्ये  विविध  क्रिडा प्रकार सुरु करुन पर्यटन विकासासाठी चालना देणार असल्याचे स्पष्ट केले.   तालुक्यातील साहसी पर्यटन विकासासाठी लवकरात लवकर पी.पी.पी.धोरण तयार  करण्यात येणार आहे.अशी  ग्वाही जुन्नर पर्यटन विकास संस्था शिष्टमंडळा समोर डाॅ अमोल कोल्हे यांनी दिली. 
या वेळी  जुन्नर पर्यटन विकास संस्यांच्या वतीने  जबाबदार पर्यटन जुन्नरचे सन्मानचिन्ह ,मढचे पेढे आणि शिवप्रतीमा देवुन खासदार डाॅ अमोल कोल्हे  साहेबांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष- श्री यश मस्करे, उपाध्यक्ष- प्रा राधाकृष्ण गायकवाड, सचिव -श्री जितेंद्र बीडवई, खजिनदार-श्री शिरीष भोर आणि जेष्ठ मार्गदर्शक  दत्ता बाळसराफ, सर्पदंश तज्ञ डाॅ.  सदानंद राऊत, साहसी  क्रिडा  तज्ज्ञ  जितेंद्र देशमुख,पत्रकार अशोक खरात,  साहित्तिक संदीप वाघोले, अमोल कुटे, शिरीष डुंबरे व मनोज हाडवळे  उपस्थित होते.

Saturday, November 21, 2020

मंचर येथे जुगार अड्डयावर पालिसांचा छापा! २३ जुगारी ताब्यात !४ लाख ७९ हजार रु.चा मुद्देमाल जप्त.

 पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख यांच्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवैध्य धंदयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पुणे ग्रामीण चे खेड-जुन्नर पथक दि. २१/११/२०२० रोजी खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पो.नि.श्री.घनवट यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की पोंदेवाडी या ठिकाणी डिंभे कालवा च्या कडेला मोठया प्रमाणात जुगार चालु आहे सदर बातमीच्या अनुशंगाने स्था.गु.शा. पुणे ग्रा.च्या जुन्नर खेड डिव्हिजन च्या टिमने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी मंचर पो.स्टे.च्या स्टाफच्या मदतीने छापा घातला असता सदर ठिकाणी एकुण २४ इसम तीन पत्ता नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले आरोपिंच्या ताब्यातुन ५९,१५९ रू रोख रक्कम व ४,२०,३४० रु जुगाराची साधने व वाहने असा एकुण ४,७९,५३० रु. चा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून एकुण २४ आरोपिंच्या विरूध्द मंचर पोलीस ठाण्यात १२(अ)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मा.पोलीस अधिक्षक  पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार  पोलीस नाईक दिपक साबळे , पो.हवा .विक्रमसिंह तापकीर , पो.कॉ. संदीप वारे , पोकॉ.निलेश सुपेकर  हे मंचर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असताना मा.पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट  यांना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , मौजे पौंदेवाडी गावच्या हददीत डिंभे उजवा कालव्याच्या दक्षिणेस येथे संतोष दौंड यांच्या शेतात सार्वजनिक ठिकाणी काही इसम तीन पानी नावाचा जुगार खेळत आहेत.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सदर बातमीचा आशय पो.हवा .विक्रमसिंह तापकीर यांना कळवुन सदर ठिकाणी छापा घालण्याबाबत 
फोनव्दारे कळविल्याने  सदर बातमीचा आशय पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक श्री . खबाले यांना कळवुन सदर ठिकाणी छापा घालणेकामी जाण्यासाठी पोलीस स्टाफची मागणी केली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री.खबाले यांनी लागलीच दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन घेवुन त्यांना बातमीचा आशय कळवुन ते पंच म्हणुन येण्यास तयार झाल्यावर पंचांसह वरील स्था.गु.शा पुणे ग्रामीणचा पोलीस स्टाफ तसेच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .कृष्णदेव खराडे , पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले , पो.ना. निलेश खैरे ,पो.ना.अजित मडके ,पो.कॉ . सोमनाथ वाफगांवकर , पो.कॉ.संदेश काळडोके , पो.कॉ.सुदर्शन माताडे,पो.कॉ.मंगेश लोखंडे  हे सरकारी आणि खाजगी वाहनाने बातमी मिळालेल्या ठिकाणाकडे रवाना झाले . 
         सदर ठिकाणच्या अलीकडे जावुन वाहने आडोशाला लावुन डोंगराच्या कडेने लपत छपत मौजे पोंदेवाडी गावचे हददीत डिंबे उजवा कालव्याच्या दक्षिणेला संतोष दौंड यांच्या ज्वारीच्या शेतात गेले असता तेथे काही इसम उघडयावर गोलकार बसुन त्यांच्या हातात पत्त्याची प्रत्येकी ३ पाने घेवुन तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना दिसले. त्यावेळी  सदर ठिकाणी १६.३० वा.छापा टाकला असता सदर ठिकाणी एकुण २४ इसम मिळुन आले असुन त्यांच्या हातात व समोर पत्त्याची पाने व रोख रक्कम दिसुन आली .
 त्यानंतर पोलिसांची चाहुल लागताच ते पैसे आणि पत्ते खाली टाकुन पळु लागले त्यावेळी पोलिसांनी त्यांना सर्वांना जागीच पकडले.  
             या प्रकरणी  १ ) विनायक दत्तात्रय हारके वय ३२ वर्षे रा . पोंदेवाडी ता . आंबेगांव जि . पुणे . २ ) रूपेश भाऊसाहेब इंदोरे वय ३७ वर्षे , रा . अवसरी खुर्द ता . आंबेगांव जि . पुणे . ३ ) बाबु उर्फ सचिन अर्जुन करंडे वय ३० वर्षे , रा . भोकरवाडी ता . आंबेगांव जि . पुणे . ४ ) विशाल नामदेव जाधव वय २६ वर्षे , ५ ) सतिष नानाभाऊ रणपिसे वय ३५ वर्षे , ६ ) सोमनाथ भगवान गायकवाड वय ३२ वर्षे , ७ ) आदीनाथ बाळासाहेब गायकवाड वय ३४ वर्षे , ८ ) मनोहर महादेव दौंड वय ३३ वर्षे , ९ ) रमेश केशव बांगर वय ३४ वर्षे , सर्व रा . पोंदेवाडी ता . आंबेगांव जि . पुणे . १० ) विजय धनसिंग चव्हाण वय ३७ वर्षे रा . शिंगवे पारगांव ता . आंबेगांव जि . पुणे .११ ) दत्तात्रय बाबुराव धरम वय ६२ वर्षे , रा . पारगांव कारखाना ता . आंबेगांव जि . पुणे . १२ ) म्हातारबा नामा कापडी वय ६० वर्षे रा . जारकरवाडी ता . आंबेगांव जि . पुणे . १३ ) जयसिंग बाबाजी इचके वय ५५ वर्षे , रा . गणेशनगर कवठेयमाई ता . शिरूर जि . पुणे . १४ ) विकास बगाराम गुळवे वय ३२ वर्षे , रा . मांजरवाडी ता . जुन्नर जि . पुणे . १५ ) बाळु नाथु पवार वय ५४ वर्षे रा . कवठे यमाई ता . शिरूर जि . पुणे . १६ ) विलास भिमाजी बागडे वय ५० वर्षे रा . पारगांव कारखाना ता . आंबेगांव जि . पुणे . १७ ) नवनाथ ज्ञानेश्वर थोरात वय ४३ वर्षे रा . मंचर ता . आंबेगांव जि . पुणे . १८ ) सावकार गोविंद भोर वय ३ ९ वर्षे रा . कवठे यमाई ता . आंबेगांव जि . पुणे . १ ९ ) विकास कारभारी पवार वय ३२ वर्षे , रा . कवठे यमाई ता . आंबेगांव जि . पुणे . २० ) सुरेंद्र शांताराम इंदोरे वय ३४ वर्षे रा . अवसरी खुर्द ता . आंबेगांव जि . पुणे .२१ ) महादु तुळशिराम टाव्हरे वय ७२ वर्षे , रा . निरगुडसर ता . आंबेगांव जि . पुणे . २२ ) शांताराम खंडु कापडी वय ६३ वर्षे रा . पारगांव ता . आंबेगांव जि . पुणे .२३ ) नामदेव दादाभाऊ जाधव वय ५१ वर्षे रा . पोंदेवाडी ता . आंबेगांव जि . पुणे यांना ताब्यात घेतले आहे. 
         सर्वांची अंगझडती घेत असताना आडोशाचा आणि अंधाराचा फायदा घेवुन तेथुन २४ ) किसन निवृत्ती टाव्हरे रा . लाखणगांव ता . आंबेगांव जि . पुणे . हा पळुन गेला आहे . 
       सदर ठिकाणी मिळुन आलेले मालाचे वर्णन पुढीलप्रमाणे . १ ) ५ ९ , १ ९ ० / रू  २)५२ पानी असलेले १७ पत्त्यांचे कॅट  ३ ) २,00,000/ रू एक मारूती सुझकी इरटीगा गाडी नंबर एमएच १४ जेई ३४६०  ४ ) ५०,००० / रू एक मारुती सुझुकी झेन गाडी नंबर एमएच ४३ एल २०१८  ५ ) १५,००० / रु एक हिरो एक्सट्रीम मो.सा.नंबर एमएच १४ जीडब्ल्यु ८८६३ . ६ ) १५,000 / रू एक होंडा शाईन मो.सा.नं. एमएच १४ डीएस ६६१७ .७ ) १५,००० / रु एक हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा.नं. एमएच १४ डीएन ८६०८  ८ ) १५,००० / रू एक हिरो होंडा एसएस मो.सा.नं. एमएच १४ झेड ०३७८ . ९ ) १५,००० / रू एक होंडा शाईने मो.सा.नं. एमएच १४ एफएच ३ ९ ४५. १० ) १५,००० / रू एक हिरो पॅशन मो.सा.नं. एमएच १४ एचजे ७२१५ . ११ ) १५,००० / रू एक हिरो होंडा पॅशन मो.सा.नं. एमएच १ ९ एसी १०७३. १२ ) १५,००० / रू एक हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा.नं. एमएच १२ एएस २७०२ .१३ ) १५,००० / रू एक बजाज सीटी १०० मो.सा.नं. एमएच १२ सीएक्स ७८ ९ २. १४ ) १५,००० / रु एक बजाज डिस्कव्हर मो.सा.नं. एमएच १४ सीव्ही ७८ ९ ८ .१५ ) १५,००० / रू एक होंडा शाईने मो.सा.नं. एमएच १२ एसएस ९२ ७८ . १६ ) ५००० / रू एक टिव्हीएस लुना मो.सा.नं. एमएच १४ एनक्यु ३८१४ जु.वा.कि.अं.रु. ४,७ ९ , ५३० / -वाहने,जुगाराचे साहित्य व रोख रक्कम आणि असा मुद्देमाल मिळून आला आहे. 
          सदर आरोपींना मिळालेल्या जुगाराच्या साहित्यासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
          पोलीस नाईक दिपक साबळे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी आरोपींच्या विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे .
            सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या आदेशानुसार पो.हवा. विक्रम तापकीर पो.ना. दिपक साबळे,पो.कॉं. संदिप वारे,पो.काँ. निलेश सुपेकर तसेच मंचर पो.स्टे पो.नि. खराडे सो व मंचर पो.स्टे.स्टाफ यांनी केली आहे.

Friday, November 20, 2020

डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे विद्यार्थी १०० उपग्रह बनवून एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम करणार !

डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे कलाम सर यांचे विद्यार्थ्यांसाठी टेकनॉलॉजि चे स्वप्न पूर्ती साठी १०० उपग्रह विद्यार्थ्यांनी बनविलेले एकाच वेळी प्रक्षेपित करणार आहे. अशी माहितीडॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषा ताई चौधरी यांनी दिली.
          या उपक्रमा मुळे शेकडो विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्याची संधी मिळणार आहे. कदाचित उद्याचे डॉ कलाम या विद्यार्थ्यांमध्ये दडलेले असू शकतात. भारतात प्रथमच अश्या प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रा मधून सुद्धा अनेक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 
         हा उपक्रम ९वी  ते १२ वि च्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. १० विद्यार्थ्यांची एक टीम एक उपग्रह स्वतः बनवेल. हे उपग्रह बनविण्याचे  ६ ऑनलाईन प्रशिक्षण दिले  जाईल. २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण होईल. सातव्या एक दिवसीय प्रत्यक्ष उपग्रह बनविणाच्या
प्रशिक्षणासाठी चेन्नई येथे स्वखर्चाने जावे लागेल.             १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान बॅच प्रमाणे एक दिवसीय प्रशिक्षण चेन्नई येथे दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून त्यांचा उपग्रह प्रत्यक्ष बनवून टेस्ट करून घेतला जाईल . 
       ७ फेब्रुवारी रोजी डी  आर डी ओ चे चेअरमन यांचे उपस्थित रामेश्वरम येथून हेलियम बलून मार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे  उपग्रह अवकाशांत सोडण्यात येतील. 
        या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् , आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये केली जाईल . 
प्रत्येक विदयार्थ्यामागे प्रशिक्षण, उपग्रह बनविणे   आणि अवकाशात सोडणे चा खर्च रुपये १०,०००/- आहे. 

          उपग्रह प्रत्यक्ष बनविण्यासाठी चेन्नई येथे स्वखर्चाने जावे लागेल. महाराष्ट्रातील सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रेन च्या ए सी ने नेणे आणि आणणे , एक दिवसीय हॉटेल चे वास्तव्य आणि इतर खर्च मिळून प्रत्येक विद्यार्थ्यास १०,०००/-  खर्च   आहे . म्हणजे एकत्रित खर्च २०,०००/- होईल. महाराष्ट्रातील फाऊंडेशन चे पदाधिकारी स्वतः विद्यार्थ्यांसोबत जातील . आणि सर्व विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करतील. 
या प्रकल्पाची नोंदणी 
१) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स 
२) आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् 
३) इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् 
मध्ये करण्यात येईलआणि प्रकल्पाचे सहभाग पत्र विद्यार्थ्यांना मिळेल . 
विदयार्थ्यास या प्रकल्पाचे होणारे फायदे 
१) जागतिक पातळीवर नोंद होणाऱ्या प्रकल्पात सहभाग 
२) उपग्रह तंत्रगण्यानं शिकण्याची संधी ३)स्वतः  प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी 
४) पूरक  अवजारांचे मोफत किट 
५) उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी . 
तरी  अश्या शाळा ज्या हा भार घेऊ शकतील किंवा एखाद्या स्पॉन्सरर तर्फे विदयार्थी येऊ शकत असतील   ज्या जिल्हापरिषद आणि महानारपालिका , नगरपालिका आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे खर्चाने पाठवू इच्छित असतील त्यांनी तर मिलिंद चौधरी ( सचिव) ९१६७१२८९०५ , मनीषा ताई चौधरी(समन्वयक महा. राज्य) ९५४५९३८९३८  , डॉ ज्योती महाजन 94234 90886 यांचेशी संपर्क करावा. 

Monday, November 9, 2020

न्हावरा,शिरूर येथे महीलेचा विनयभंग करून मारहाण करून दोन्ही डोळे निकामी केलेला आरोपी जेरबंद ! पुणे ग्रामीण पोलीसांची संयुक्त कामगिरी

ग्राहक समाचार  News portal
      कार्यकारी संपादक - अमर भागवत

    दिनांक ०३/११/२०२० रोजी रात्री ९ .००वा. च्या सुमारास न्हावरा , शिरूर या ठिकाणी राहणारी पिडीत महीला ही बाथरूमला गेलेली असताना  मौजे न्हावरा  ता.शिरूर जि.पुणे गावच्या हददीत चार टॉवरजवळ एक अनोळखी इसम त्याचे वर्णन उंचीने बुटका,तोंडाला लाल रंगाचा कपड़ा बांधलेला असे असूनत्याने पिडीत महिलेची छेडछाड काढुन तिला मारहाण करून तिचे दोन्ही डोळयांना गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं .६३ ९ / २० भादवि कलम ३०७,३२६,३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
         सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा .विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.मनोज लोहीया यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख , मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहीते ,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस यांनी व पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे शिरूर , शिक्रापूर , भिगवण , यवत , बारामती तालुका , दौंड , इंदापूर या विविध पोलीस स्टेशनचे पथक गुन्हयाच्या तपासकामी बोलावून घेवून त्यांना कामाची विभागणी करून जबाबदारी दिलेली होती . 
    सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत पोलिस नाईक.मोमीन स्थानिक गुन्हे शाखा.पुणे ग्रामिण . यांना बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा घडल्यानंतर राजे कॉम्प्लेक्स परिसराच्या समोरील बाजूस असणाऱ्या  चायनिज सेंटरमध्ये काम करणारा वेटर याने त्याचे दाढी व डोक्याचे केस काढलेले आहेत तसेच त्याचे वर्णन गुन्हयातील पिडीतेने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे जुळत आहे तो कोठेतरी निघून गेला आहे अशी माहीती समजल्यानंतर लागलीच मा . पोलीस अधीक्षक श्री . देशमुख सो . यांनी संशयीत इसमाचा शोध घेण्याकरीता तपास पथक तयार करून रवाना केल्या होते त्याप्रमाणे पथकाने संशयीत इसमाचा वावर असणाऱ्या परिसरात सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून सी.सी.टी.व्ही . फुटेज हस्तगत केले व फुटेजच्या आधारे संशयीताचा शोध घेतला असता पथकाला संशयीत इसमाचा स्वभाव हा रागीट आहे , नेहमी दारुच्या नशेत धुंद असतो , भगव्या रंगाचा मफलर वापरतो , नेहमी कोणाशीही कोणत्याही कारणावरून वाद घालतो , त्याच्या हातात एक शंकराची पिंड असून त्यावर नागाच्या फण्याचा आकार आहे , भिक मागत फिरतो , मुका असल्याचे ढोंग करतो अशी माहीती समजलेली होती त्यानुसार पोलीस पथकाने अखंडीतपणे नमुद आरोपीचा शोध घेतला असता त्याचे नाव कुंडलीक साहेबराव बगाडे ,रा.उंडवडे सुपे,ता.बारामती,जि.पुणे असे असल्याचे समजले व त्याचा वावर हा श्रीगोंदा - पारनेर तालुक्यातील विविध गावात असल्याची माहीती समजली त्यानंतर ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत व पोलीस खबऱ्यांमार्फत श्रीगोंदा - पारनेर तालुक्यातील स्थानिक नागरीकांच्या मदतीने प्रत्येक गावात सोशल मीडिया द्वारे व संदेशादारे संशयीताची माहीती व्हायरल करीत त्याचे जाण्याचे मार्ग शोधून काढले तसेच संभाव्य जाण्याचे ठिकाणे पाहुन त्या ठिकाणी संशयीताचा शोध घेतला गुन्हा झाल्यानंतर फिर्यादीनी दिलेली फिर्याद व जखमीने दिलेला जबाब यामध्ये केवळ आरोपीचे वर्णन व त्यांच्या अंगावर असलेला लाल रंगाचा पंचा एवढया अपु - या माहितीवरुन तैनात केलेले तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी न्हावरा गावातील साक्षीदाराच्याकडे तपास करून अथक प्रयत्न करुन आरोपीचे नाव निष्पन्न केले.
               दि ०९ / ११ / २०२० रोजी पोलीस निरीक्षक उमेश तावसकर , सपोनि मयुर वैरागकर व पो.ना. हरीष शितोळे १६१४ शिक्रापुर पोलीस स्टेशन यांनी संध्याकाळी शिक्रापुर चाकण चौक येथुन संशयित ईसम नामे कुंडलिक साहेबराव बगाडे रा उंडवडे  यास ताब्यात घेतले असुन आरोपी हा रागीट स्वभावाचा असल्याचे माहिती प्राप्त असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.प्रविण खानापुरे , शिरूर पोलीस स्टेशन हे करीत आहेत . 
         सदर गुन्हयाचे तपासकामी असणारे अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे . 
१ ) पोलीस निरीक्षक श्री . पदमाकर घनवट , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण २ ) पोलीस निरीक्षक श्री . प्रविण खानापुरे , शिरूर पोलीस स्टेशन ३ ) सहा . पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , स्थानिक गुन्हे शारखा , पुणे ग्रामीण , ४ ) सहा . पोलीस निरीक्षक जीवन माने , भिगवण पो.स्टे . , ५ ) सहा . पोलीस निरीक्षक लंगोटे , बारामती तालुका पो.स्टे . , ६ ) पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननवरे , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण , ७ ) पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण , ८ ) पोलीस उप निरीक्षक गणेश जगदाळे , शिरूर पो.स्टे . , ९ ) पोलीस उप निरीक्षक भगवान पालवे , शिरूर पो.स्टे . , १० ) पोलीस उप निरीक्षक सुनिल मोटे , शिरूर पो.स्टे . , ११ ) पोलीस उप निरीक्षक राजेश माळी , शिक्रापूर पो.स्टे . , १२ ) पोली उप निरीक्षक गंपले , यवत पो.स्टे . , १३ ) महीला पोलीस उप निरीक्षक अमृता काटे , दौड पोलीस स्टेशन.

Tuesday, November 3, 2020

नारायणगाव येथील साकार नगरी मध्ये बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून दीड लाखांचे मंगळसूत्र चोरी !

     
 दि. 2 रोजी पहाटे च्या सुमारास 
 नारायणगाव येथील साकार नगरी येथे  अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचा कोयंडा तोडुन बेडरूममधील कपाटामध्ये ठेवलेले  ४१ ग्राम वजनाचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरून नेले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डी के गुंड यांनी दिली. 
          याबाबत पुष्पा काशिनाथ नगरकर रा. साकारनगरी फ्लट नं 7, जुन्नर रोड, नारायणगाव ता. जुन्नर यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे .                      पोलिसांनी भादंवि कलम ३८०,४५७ नुसार गुन्हा दाखल केला आहे .
            याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  पुष्पा नगरकर ह्या मोशी येथे त्यांच्या मुलाकडे घर बंद करून गेल्या होत्या . सकाळी ६ वा  बिल्डींग मध्ये चोरी झाली आहे. तुमच्या घराचा कोयंडा तोडुन कोणीतरी आत जावुन चोरी केली आहे.अशी माहिती कळताच नगरकर यांनी नारायणगाव येथे येऊन घरामध्ये जावुन पाहीले असता बेडरूम मधील सर्व सामानाची उचकापाचक केलेली व साहीत्य आस्त व्यस्त पडलेले दिसले तसेच बेडरूममध्ये  कपाटाचा दरवाजा उचकटुन त्यामध्ये ठेवलेले  दीड लाख किमतीचे ४१ ग्रँम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व  1,500/- रू रोख रक्कम अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे निदर्शनास आले . 
           तसेच सोसायटीमधील जगन पांचाळ यांचे काही चांदीची भांडी व २ ग्रॅम सोन्याची
 नथ व वसंत हदले यांचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला होता . यापुढील तपस नारायणगाव पोलीस हे करीत आहेत .
                       मागील दोन दिवसात नारायणगाव येथील चार दुकानांचे शटर उचकटून चोरी केली मात्र पेट्रोलिंग साठी आलेली पोलीस व्हॅनचा सुगावा चोरट्यांना लागला आणि त्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही पुटेज ताब्यात घेतले असून,त्यात गेल्या दोन दिवसात घडणाऱ्या चोरीच्या घटनांमधील चार चोरट्यांचे आणि  रविवारच्या घटनेतील दोन चोरट्यांचे सीसीटीव्ही पुटेज नारायणगाव पोलिसांना मिळाले आहेत.
       ,पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.अशी  माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
        रविवार (दि.१) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्गावरील सुदर्शन बोरकर यांच्या शेवंताई गॅस एजन्सीच्या गोडाउनचे आणि बुलेट शोरूमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी काउंटरच्या ड्राँव्हरमधील तीन लाख नऊ हजार रुपयांची रोख रक्कम आणि गॅस शेगड्या(सूर्या कंपनीच्या) सुरक्षा होज पाईप,सॅमसंग कंपनीचा एलसीडी,शंभर रेग्युलेटर,पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,हेल्मेट,जॅकेट आदी साहित्य असा  ११ लाख ९८ हजारांचा ऐवज लंपास केला.
           या घटनेतील दोन चोरट्यांचे सीसीटीव्ही पुटेज मिळविण्यात पोलिसांनी तपासाची मुख्य माहिती मिळवल्या नंतर रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्ग शिवारातील धर्मराज प्लाझा मधील
श्रीकृष्ण किराणा दुकान आणि इलेक्ट्रिकल या दोन दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील सुमारे चार हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.अशी माहिती मालक संतोष माताडे आणि बाबू पटेल यांनी दिली.
              पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस करीत आहेत.