दि. 2 रोजी पहाटे च्या सुमारास
नारायणगाव येथील साकार नगरी येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचा कोयंडा तोडुन बेडरूममधील कपाटामध्ये ठेवलेले ४१ ग्राम वजनाचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरून नेले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डी के गुंड यांनी दिली.
याबाबत पुष्पा काशिनाथ नगरकर रा. साकारनगरी फ्लट नं 7, जुन्नर रोड, नारायणगाव ता. जुन्नर यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे . पोलिसांनी भादंवि कलम ३८०,४५७ नुसार गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा नगरकर ह्या मोशी येथे त्यांच्या मुलाकडे घर बंद करून गेल्या होत्या . सकाळी ६ वा बिल्डींग मध्ये चोरी झाली आहे. तुमच्या घराचा कोयंडा तोडुन कोणीतरी आत जावुन चोरी केली आहे.अशी माहिती कळताच नगरकर यांनी नारायणगाव येथे येऊन घरामध्ये जावुन पाहीले असता बेडरूम मधील सर्व सामानाची उचकापाचक केलेली व साहीत्य आस्त व्यस्त पडलेले दिसले तसेच बेडरूममध्ये कपाटाचा दरवाजा उचकटुन त्यामध्ये ठेवलेले दीड लाख किमतीचे ४१ ग्रँम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व 1,500/- रू रोख रक्कम अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे निदर्शनास आले .
तसेच सोसायटीमधील जगन पांचाळ यांचे काही चांदीची भांडी व २ ग्रॅम सोन्याची
नथ व वसंत हदले यांचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला होता . यापुढील तपस नारायणगाव पोलीस हे करीत आहेत .
मागील दोन दिवसात नारायणगाव येथील चार दुकानांचे शटर उचकटून चोरी केली मात्र पेट्रोलिंग साठी आलेली पोलीस व्हॅनचा सुगावा चोरट्यांना लागला आणि त्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही पुटेज ताब्यात घेतले असून,त्यात गेल्या दोन दिवसात घडणाऱ्या चोरीच्या घटनांमधील चार चोरट्यांचे आणि रविवारच्या घटनेतील दोन चोरट्यांचे सीसीटीव्ही पुटेज नारायणगाव पोलिसांना मिळाले आहेत.
,पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
रविवार (दि.१) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्गावरील सुदर्शन बोरकर यांच्या शेवंताई गॅस एजन्सीच्या गोडाउनचे आणि बुलेट शोरूमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी काउंटरच्या ड्राँव्हरमधील तीन लाख नऊ हजार रुपयांची रोख रक्कम आणि गॅस शेगड्या(सूर्या कंपनीच्या) सुरक्षा होज पाईप,सॅमसंग कंपनीचा एलसीडी,शंभर रेग्युलेटर,पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,हेल्मेट,जॅकेट आदी साहित्य असा ११ लाख ९८ हजारांचा ऐवज लंपास केला.
या घटनेतील दोन चोरट्यांचे सीसीटीव्ही पुटेज मिळविण्यात पोलिसांनी तपासाची मुख्य माहिती मिळवल्या नंतर रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्ग शिवारातील धर्मराज प्लाझा मधील
श्रीकृष्ण किराणा दुकान आणि इलेक्ट्रिकल या दोन दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील सुमारे चार हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.अशी माहिती मालक संतोष माताडे आणि बाबू पटेल यांनी दिली.
पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment