ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत
शिरोली :
जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज शनिवारी दि. ९ नोव्हेंबर-२०१९ सकाळी-१०.०० वाजता शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसेच माजी आमदार शरददादा सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून उत्साहावर्धक वातावरणात संपन्न करण्यात आला.
याप्रसंगी विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी आमदार दिलीपराव ढमढेरे, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, जयहिंद ग्रुपचे तात्यासाहेब गुंजाळ, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, तान्हाजी बेनके,अनंतराव चौगुले, जिल्हा दूध संघाचे बाळासाहेब खिलारी, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, हभप रामदास कुटे, रमेश भुजबळ, गणेश कवडे, मकरंद पाटे, अजित काळे, पांडूरंग गाडगे, निवृत्ती काळे, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, नंदूकाका शेरकर, सुखदेव नेहरकर, नगरसेविका हाजरा इनामदार, अर्चना भुजबळ, उज्वला शेवाळे, विजय भोर, गणपत शेटे, गणपत कवडे, विघ्नहरचे सर्व माजी संचालक, पंचायत समिती पदाधिकारी, पंचक्रोशितील विविध गांवाचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायट्याचे चेअरमन आदि मान्यवरांसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विघ्नहरचे सर्व अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विधीवत गव्हाणपुजन करण्यात येवून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्यात आली.
प्रास्ताविक करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, मागिल गळीत हंगामात विघ्नहरने १० लाख ७५ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले. त्यामधून १२ लाख ५३ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले. व ११.६५% साखर उतारा मिळवला. या गाळप हंगामात विघ्नहरने ८ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकारक झालेला असून धरणसाठ्यांची परिस्थीतीही चांगली आहे. परतीच्या पावसाने सध्या सगळीकडे धूमाकुळ घातलेला असून अद्यापिही परतीचा पाऊस सुरुच आहे. यापावसाने शेतकर्यांचे कांदा, सोयाबिन, द्गाक्ष, भाजीपाला पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून शेतकर्यांना शासकिय मदतीची आवश्यकता आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नाही. ऊस हे एकच पीक आहे, ज्यामधून शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकर्यांची अपेक्षा असते की ऊसास जास्तीत जास्त भाव मिळावा. परंतू शेतकर्यांना भाव देण्याबरोबरच संस्थाही टिकली पाहिजे याचा विचार होणे गरजेचे आहे. यासर्व बाबींचा विचार करुन विघ्नहरच्या संचालक मंडळाने २०१८-१९ साठी गळीतास आलेल्या ऊसास विनाकपात २९५०/- प्र. मे. टन दर देण्याचे ठरविले असून आत्तापर्यन्त सभासद, व ऊस उत्पादकांना २७८५/- रुपये अदा केलेले आहेत. उर्वरीत १६५/- रुपये पैशांची उपलब्धता झालेनंतर अदा करणेत येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्व.शेठबाबांचे विचाराने आणि स्व.आण्णांच्या मार्गदर्शनाच्या शिदोरीवर विघ्नहरची वाटचाल सुरु असून सर्व ऊस उत्पादकांनी नोंद केलेला ऊस विघ्नहर कारखान्यास गळीतासाठी घालावा, अशी विनंती त्यांनी याप्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतकर्यांना केली. तसेच मोठ्या संख्येने गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार मानून धन्यवाद व्यक्त केले.
विघ्नहर कारखान्याने ऊस उत्पादकांना सतत चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला. सतत पेक्षा जास्त भाव देण्याची परंपरा कायम ठेवली. परंतू आयकर विभागाने विघ्नहर कारखान्याला पेक्षा जास्त भाव दिल्याने २०५ कोटी रुपये इन्कमटॅक्स भरणेची नोटीस पाठविलेली आहे. उत्पन्नातून खर्च वजाजाता शिल्लक राहिलेली रक्कम जर विघ्नहर कारखाना ऊस उत्पादकांना देत असेल तर ती जास्तीची रक्कम कारखान्याचा नफा समजून जर त्यावर इन्कमटॅक्स लावत असेल तर कारखाने चालू ठेवणे अशक्य होणार असल्याचे विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यावेळी म्हणाले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, सध्या साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट असून साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहिर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण साखर कारखानदारी प्रतिकुल परिस्थीतून वाटचाल करीत असतानाही विघ्नहर कारखान्याने मात्र ऊस उत्पादकांना उत्कृष्ठ असा ऊसदर देवून चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी संस्थापक चेअरमन माजी खासदार स्व. शेठबाबांनी कारखान्याला मिळालेल्या उत्पन्नातून खर्च वजाजाता जास्तीतजास्त रक्कम शेतकर्यांना देण्याचा रचलेल्या पायावर विघ्नहरची विश्वासरुपी इमारत उभी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाला असून पर्यटन हे तालुक्यातील जनतेच्या उपजिवीकेचे साधन बनेल अशा पध्दतीने तालुक्याचा विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून निस्वार्थ भावनेने काम केले पाहिजे, असे सांगून विघ्नहर कारखान्याच्या आगामी गाळप हंगामास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, विघ्नहर कारखान्याचा कारभार सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शकपणे सुरु आहे. यापुढील काळात कारखान्याच्या विकासाकरीता सत्यशिल शेरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच यापुढील काळात शेतकर्यांसाठी जुन्नर व आंबेगांव तालुक्यातील धरणसाठ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिलीपराव ढमढेरे म्हणाले की, माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेवून धालेवाडीच्या या माळरानावर विघ्नहर कारखान्याची उभारणी करुन हा परिसर फुलवला. विद्यमान चेअरमन सत्यशिल शेरकर हे सुध्दा विघ्नहर कारखान्याचा कारभार अगदी उत्कृष्ठ पध्दतीने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विघ्नहर कारखान्यामुळे या परिसरातील शेतकरी खर्याअर्थाने समृध्द झाला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी माजी आमदार शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, संजय काळे, तान्हाजी बेनके आदिंनी आपले विचार व्यक्त केले व विघ्नहरच्याम्आगामी गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी केले. तर आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.

No comments:
Post a Comment