Pages

Monday, November 4, 2019

भीमाशंकर सहकारी साखर लिमिटेड चा २० वा "बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रम" संपन्न

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत 



पारगाव तर्फे अवसरी बु :
                                 भीमाशंकर सहकारी साखर ली. दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., चा २० वा "बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रम" आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी सभासद, संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, कर्मचारी व भीमाशंकर कारखान्याचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                 यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. उसाची कमतरता भासणार असल्याने यंदा हंगाम कमी काळ चालेल, तसेच बरेच कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करू शकणार नाहीत असे चित्र आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक अडचणीची स्थिती निर्माण झालेली आहे. तेथील मोजकेच कारखाने यंदा उसाचे गाळप करण्याची शक्यता आहे. राज्यातील साखर कारखान्यांना गळीत हंगाम नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान सुरू होईल. मराठवाड्यात यंदा तीव्र दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध ऊस चाऱ्यासाठी विकून टाकलेला आहे. तर दुसर्‍या बाजूला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात महापुरामुळे उसाचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध होणार नाही, त्यामुळे अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्याची शक्यता नाही.

                                गेल्या हंगामात राज्यातील 195 साखर कारखान्यांनी 952 लाख टन गाळप केले. एकूण 107 लाख टन साखर उत्पादन झाले. यंदा मात्र बंद कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राज्यातील साखर उद्योगाला वार्षिक 2000 कोटी रुपयांचा महसूल सरकारला देते. गाळप हंगामाचा कमी कालावधी आणि अनेक ठिकाणी बंद राहणारे साखर कारखाने याचा थेट परिणाम शेतकरी, ऊस तोड मजूर, आणि व्यापाऱ्यांवर होणार आहे. ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटी लोक चरितार्थासाठी साखर गळीत हंगामावर अवलंबून आहेत. साखर उद्योगामुळे 1 लाख 65 हजार लोकांना थेट रोजगार मिळतो आहे. तर सुमारे 8 लाख मजुरांना ऊसतोड आणि वाहतुकीच्या कामातून रोजगार उपलब्ध होत आहे.

No comments:

Post a Comment