कार्यकारी संपादक : अमर भागवत
ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल
नारायणगाव -
पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती मंडळांचे अध्यक्ष सभासद पोलीस पाटील तसेच शांतता कमिटी सदस्य व पत्रकार यांची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक आज दि.२७ रोजी ५ वाजता नारायणगाव पोलीस स्टेशन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
या बैठकीमध्ये गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या. डॉल्बी न वाजविणे, ऑनलाइन परवानगी फॉर्म भरणे, गणपती उत्सव मंडळांनी त्यांच्या निधीमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविने, गणेश विसर्जन
मिरवणुकीमध्ये गुलाल, डाॅल्बी यांचा वापर करु नये, सूर्यास्तापूर्वी गणपती विसर्जन करणे, मिरवणुकीत प्रत्येक मंडळ दोन पेक्षा जास्त वाहने ठेवता येणार नाहीत मंडप, वाद्य वाजविणे, स्पिकर इत्यादी परवाणे घेणे अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच पूरग्रस्तांना शालेय साहित्य गणपती मंडळाकडून जमा करुन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान नारायणगाव मधील पोलीस अधिकारी , कर्मचारी, पोलीस पाटील , ग्रामसुरक्षा दल यांच्या वतीने एक हात मदतीचा या हेतूने कोल्हापुर येथे जिवनावश्यक वस्तु चे दोन ट्रॅक साहित्य रवाना केले.
सदर बैठकीमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी १०० ते १२५ गणपती मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, राहुल गावडे, मुकेश वाजगे, संभाजी चव्हाण,माजी उपसरपंच संतोष दांगट आदी मान्यवर तसेच सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.



No comments:
Post a Comment