नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये दि. 22/10/2020 रोजी दाखल केलेल्या गुन्हयामध्ये एक अल्पवयीन मुलीस तुषार प्रभाकर जाधव वय 19 वर्ष या युवकाने त्याचा मित्र साईप्रसाद हनुमंत देवाडे वय 19 वर्ष याच्या सहायाने फूस लावून पळवून नेले होते. सदरील अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात नारायणगाव पोलीस ठाणेच्या पोलीसांना यश आले असून नमूद मुलीचा पाठलाग करणे व तिचा विनयभंग करून तिस फूस लावून पळवून नेणे असे भा. द. वि. कलम 354(A)(D) सह कलम 8,12 पोक्सो कायदया अंतर्गत यातील आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
नमूद आरोपींना पोलीसांनी खेड सत्र न्यायालयासमक्ष हजर केले. खेड सत्र न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय गुंड यांनी दिली.
सदर गुहयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.
No comments:
Post a Comment