Pages

Wednesday, July 22, 2020

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी हॉटेल गावठी कट्टा च्या मालक आणि कामगारावर गुन्हा दाखल

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
शिरोली सुलतानपूर ( ता . जुन्नर ) येथील गावठी कट्टा या हॉटेल च्या पाठीमागे अवैधरित्या 
देशी-विदेशी दारू विकणाऱ्या कामगारावर व हॉटेलच्या मालकावर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली .      
        याप्रकरणी रामजीत मानोराम निशाद ( वय २३ , राहणार शिरोली सुलतानपूर तालुका जुन्नर , मूळ राहणार सारैया , मल्लेपुर , तालुका भीटी , जिल्हा फैजाबाद , उत्तर प्रदेश ) हा कामगार  त्याचे हॉटेल मालक रविंद्र रामकृष्ण पटाडे ( राहणार साळवाडी , तालुका जुन्नर ) यांच्या सांगण्यावरून हॉटेल गावठी कट्टा च्या पाठीमागे अवैधरित्या
 देशी विदेशी दारू ची विक्री करताना आढळला . 
          त्याच्या ताब्यातील ३ हजार ४०० रुपयांची 
देशी-विदेशी दारू तसेच २१ हजार ४१० रुपये रोख रक्कम असा एकूण २५ हजार ७७ रुपयेचा मुद्देमाल मिळून आला . 
      यातील आरोपी रामजीत निशाद याला अटक करून जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आले . 
              सदर कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील , पोलीस नाईक धनंजय पालवे , पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल , नवीन अरगडे यांनी पार पाडली .
          या घटनेचा तपास पोलीस नाईक रामचंद्र शिंदे हे करीत आहेत .

No comments:

Post a Comment