ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
(दि.४) नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुकानदारांनी तसेच हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचे पालन केले नाही म्हणून नारायणगाव
व वारुळवाडी येथील६ दुकानदारांवर तसेच २ हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सपोनि घोडे पाटील यांच्या सह पोलीस स्टाफ पेट्रोलीग करीत असताना जुन्नर रोडला असणारे काशीद एंटरप्राइजेस ,काशीद किराणा, वारूळवाडी येथील भागेश्वर इलेक्ट्रिक हाऊस, भागेश्वर किराणा दुकान,साई किराणा स्टोअर्स , कॉलेज रोड वरील ओंकार किराणा या ठिकाणी या दुकानामध्ये असणाऱ्या इसमांनी मास्क न लावता व पाच पेक्षा अधिक गिऱ्हाईकांना त्यांची आरोग्याची कोणतीही काळजी न घेता व त्यांना सॅनीटायझर तसेच हात पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नव्हती.
याबाबत पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे इसम नामे १) उमर गफूर तांबोळी रा. ना. गाव (काशीद एंटरप्राइजेस) २) अस्लम इब्राहिम तांबोळी रा.ना.गाव ता जुन्नर जि. पुणे (काशीद किराणा ) ३)बाळासाहेब बबन वारुळे रा.वारूळवाडी ता. जुन्नर जि. पुणे ( भागेश्वर जनरल स्टोअर) ४) दिनेश सदाशिव मेहेर रा. वारूळवाडी ता. जुन्नर जि पुणे(भागेश्वर
इलेक्ट्रिक हाऊस ) ५)मनीषा संजीव उकिर्डे रा.वारूळवाडी (ओंकार किराणा) ६)अनिल विश्वास भुजबळ रा.वारूळवाडी (साई किराणा ) ७) चिराग राजेंद्र कोऱ्हाळे रा.नारायणगाव (यशोधन हॉटेल) ८) महेश रघुनाथ वालझाडे रा.वालझाडे मळा नारायणगाव (साई समृद्धी हॉटेल)
तसेचलॉक डाउन शिथील केल्यापासून नारायणगाव येथे गर्दीचे प्रमाण वाढल्या मुळे
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले होते की,
१) दोनचाकी वाहनावर डबल सीट कोणीही येणार नाही.२) चारचाकी वाहनांतून दोनच इसम येतील( ड्रायव्हर व पाठीमागे एक ) ३) चारचाकी वाहनांची पार्किंग मीना नदी वाहन तळावर होईल No Parking मधे वाहन लावल्यास कायदेशीर कारवाई करून वाहन जप्त करण्यात येईल ४)सार्वजनिक ठिकाणी व अत्यावश्यक सेवेच्या दुकानात social distance न पाळल्यास व मास्क न लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.अशा
सूचना सोशलमीडिया च्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या या सूचनांचे पालन न केल्याने डबल सीट प्रवास करणाऱ्या 40 जणांवर कारवाई करून वाहने जप्त करण्यात आली आहेत.
त्यांच्यावर प्रचलीत कायदान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास स. फौ.ढमाले, पो. हवा. कोकणे,पो.हवा सातपुते,पो.ना जढर हे करीत आहेत.
ना. गाव पो.स्टे हद्दीमधील सर्व दुकानदार तसेच हॉटेल व्यावसायिक यांना आवाहन करण्यात येते की ,आपल्या दुकानामध्ये तसेच हॉटेलमध्ये काम करणारे कामगार, गिऱ्हाईक, इसम यांना मास्क लावणे,सॅनीटायझर ठेवणे, हात पाय धुण्यासाठी पाणी ठेवणे या व इतर सुचनाचे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल केले जाईल यांची नोंद घ्यावी!
श्री.अर्जुन घोडे पाटील
( सहा. पोलीस निरीक्षक
नारायणगाव पो. स्टेशन)
No comments:
Post a Comment