Wednesday, April 15, 2020

धनगरवाडीत गावठी दारूच्या भट्टी वर पोलिसांचा छापा ! ३० लि. दारू व ८०० लि. कच्चे रसायन नष्ट

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) 
कार्यकारी संपादक: श्री. अमर भागवत
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनगरवाडी येथे बेकायदा गावठी दारू तयार करणाऱ्या दोन हातभट्टी वर नारायणगाव पोलिसांनी छापा मारून ३० लिटर गावठी दारू व ८०० लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

         पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार
दि.१५/०४/२o२० रोजी ०५/२५ वा.चे सुमारास मौजे धनगरवाडी गावचे  हद्दीत आरोपी दिलीप रूपा बिरे रा. कसबे वस्ती धनगरवाडी ता. जुन्नर जिल्हा पुणे याच्या राहत्या घराच्या समोर बेकायदा बिगर परवाना २१००० /- रू.किंमतीची १०लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ४०० लिटर कच्चे रसायन मिळून आले. पो. कॉ. स्वप्नील मच्छिंद्र लोहार यांनी याबतची फिर्याद दिली. 
     दरम्यान दुसऱ्या कारवाईत निलेश मारवाडी रा.कसबेवस्ती धनगरवाडी ता.जुन्नर जि. पुणे दि. १५/०४/२०२०रोजी १६/२७ वा मौजे धनगरवाडी गावच्या हद्दीत चिक्कुच्या बागेजवळील ओढ्यात बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन जवळ बाळगले स्थितीत असताना त्याला पकडण्या साठी गेले असता तो पोलिसांची चाहूल लागतात ऊसाच्या शेतात पळून गेला. त्याच्याकडे 22000 /- रुपये किमतीची 20 लिटर गावठी  हातभट्टीची तयार दारू व ४००लिटर कच्चे रसायन मिळून आले.याबाबत सुरेश देवराम गुंगले यांनी फिर्याद दिली आहे.
          दोन्ही कारवाई मध्ये मिळून आलेली  हातभट्टीची गावठी दारू व कच्चे रसायन पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले असून दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती स.पो. नि.घोडे पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment