Thursday, February 27, 2020

GMRT खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

ग्राहक समाचार News / Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत


             दि. २८ फेब्रुवारी या जागतिक विज्ञान दिनानिमित्त  २८ व २९ फेब्रुवारी या दोन दिवशी जुन्नर तालुक्यातील खोडद येथे जीएमआरटी प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे,या दोन्ही दिवशी हे दुर्बीण केंद्र व इतर विद्यालये व महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ( विनामूल्य ) खुले ठेवण्यात येणार आहे.विज्ञान प्रदर्शनात ४२ महाविद्यालये,३३ शाळा व २० संशोधन संस्था सहभागी होणार असून एकूण २०० प्रकल्प या प्रदर्शनात पहायला मिळतील,अशी माहिती विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष प्रा.यशवंत गुप्ता,
जीएमआरटीचे
 वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी  डॉ.जे.के.सोळंकी,प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी दिली.
       विज्ञान प्रदर्शनाच्या या आयोजनामुळे अनेक विद्यार्थांना अनेक प्रकारचे उच्च अभ्यासक्रम व करिअर बद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. या भागातील विद्यालये, महाविद्यालये व शाळांना मागील अनेक वर्षांपासून खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाकडून गणित,भौतिक,रसायन व जीवशास्त्रतील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी  विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.या वर्षी दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२० या दोन्ही दिवशी हे प्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वासाठी खुले असणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी सांगितले.
     प्रदर्शनातील प्रकल्प प्राथमिक ( ५वी ते ७ वी ), माध्यमिक ( ८ वी ते १० वी ), उच्चमाध्यमिक ( डिप्लोमा, डिग्री , बी एस सी ) आणि अभियांत्रिकी ( इंजिनियरिंग ) अशा चार गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी पारितोषिके देण्यात येणार आहे,तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार असून प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या ( नोंदणीकृत ) विद्यार्थांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
        या प्रदर्शनाचे उदघाटन  हैद्राबाद येथीलनॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे (इसरो)  वैज्ञानिक शंतनू चौधरी  यांचे हस्ते २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे, तसेच कार्यक्रमाचा  समारोप २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होईल.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ परिवहन अधिकारी अनिल पंतोजी उपस्थित राहणार आहेत.
      या विज्ञानदिन समितीचे अध्यक्ष प्रा.यशवंत गुप्ता,संयोजक डॉ.जे.के.सोळंकी,सहसंयोजक अभिजित जोंधळे,जी.जे.शेलटन,प्रमोद पडवळ,अजी पुनातू ,युवराज कांबळे,चारुदत्त कानडे,हनुमंतराव भंडारी,मंगेश  सोमवंशी,गुंडीराज  थोरात,मंगेश उंबरजे,ज्ञानेश्वर पवार,विनोदकुमार वर्मा,सुरेंद्र गोरील,भावेश कुणबी,दिव्य ओबेरॉय,प्रीतिष मिश्रा यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी  परिश्रम घेतले आहेत.
      या विज्ञान प्रदर्शनात नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (इसरो) - हैद्राबाद यांचा 'स्पेस ऑन व्हील्स' हा प्रकल्प विशेष आकर्षण असणार आहे,तसेच कांदा व लसूण संशोधन केंद्र,राजगुरुनगर,आघारकर अनुसंधान संस्था, पुणे,राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ( नारी ), पुणे,आघारकर अनुसंधान संस्था - पुणे, पुणे,भारतीय उष्ण देशीय हवामान विज्ञान संस्था, पुणे,भूशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ,मॉझील्ला, इंडिया,आयुध अनुसंधान एवं विकास स्थापना ( ए आर डी ई ), पुणे,प्लाझ्मा अनुसंधान संस्था, गांधीनगर, गुजरात,विज्ञान वाहिनी यांचे प्रयोग,स्पेस ओडिसी प्लॅनेटोरिअम-अहमदनगर,फ्री सॉफ्टवेअर कम्युनिटी इंडिया,विज्ञान आश्रम - पाबळ,सी- स्काय दुर्बीण, मुंबई,आकाश मित्र मंडळ, मुंबई,पुणे जिल्ह्यातील शाळा व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जवळपास २०० प्रकल्प या प्रदर्शनात असणार आहेत.

Tuesday, February 11, 2020

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्रीगणाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने साजरा होणार - अतुल बेनके

           
ग्राहक समाचार News/Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक अमर भागवत
               जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी येथे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने साजरा होणार आहे.शिवजयंतीनिमित्त जुन्नर मध्ये दिनांक १४ ते १९ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर येथे आयोजित बैठकीत 
केले आहे. 

              किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्यावतीने या वर्षापासून शिवजयंतीला राज्यातील एका प्रतिभावंत छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
            राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष कारभारी डुंबरे या पुरस्काराचे प्रथम मानकरी असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली 
               यावेळी दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मारुती ताजणे यांना शिवनेरी भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
                छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गडावरील व्यवस्थेची व कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.
             या सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी,जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,प्राजक्ता तनपुरे,खासदार 
डॉ. अमोल कोल्हे ,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे,
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आदींसह 
जिल्ह्यातील मान्यवर महा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
                                शिवजयंती उत्सवानिमित्त जुन्नरमध्ये वकृत्वस्पर्धा, मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा, पोवाडा गायन, महिलांकरिता हळदीकुंक,  राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, गड चढणे स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती आखाडा, नंदेश उमप यांचा शिव सोहळा कार्यक्रम, लखलख चंदेरी हा मनोरंजनाचा कार्यक्रम, आयोजित करण्यात आला आहे.
          

                      शिवजयंती दिनी शिवनेरीच्या पायथ्याशी दत्त मंदिर परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली आहेत गडावरील शिवजन्मस्थान व शिवकुंज या ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार असून सकाळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा शिवाई माता मंदिर ते शिवजन्मस्थळ पालखी सोहळा व जन्मस्थानी शिवजन्म सोहळा कार्यक्रम मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके,परिसरातील विकासकामांची पाहणी, जुन्नर मधील बाजार समिती प्रांगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अन्य मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे,
   
                            जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, जिल्हा दूध संघ हा उत्सव संयुक्तरित्या साजरा करणार असून त्यासाठी निधीची तरतूद केली असल्याचे बेनके यांनी सांगितले.
            सुरक्षा बाबींकडे पोलीस खात्याची करडी नजर राहणार आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था केल्याची माहिती पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी दिली 
                           यावेळी तहसीलदार हनमंत कोळेकर, नायब तहसीलदार सचिन मुंडे, मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाटील, पूरातन विभागाचे बाबासाहेब जंगले, बाजार समितीचे सभापती संजय काळे, सभापती विशाल तांबे, उपसभापती रमेश खुडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊ देवडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
                                     (छायाचित्रे - संग्रहीत)

निमगाव सावात रंगला युवा महोत्सव

ग्राहक समाचार News/ Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
  
             निमगाव सावा (ता. जुन्नर ) येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात युवा महोत्सव जल्लोषात पार पडला. युवा महोत्सवातील सहा दिवसांमध्ये क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध, सुंदर हस्ताक्षर, पाककला, रांगोळी, मेहंदी, पुष्पगुच्छ या विविध स्पर्धा आणि कॅप डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, चॉकलेट डे, टाय डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे साजरे करण्यात आले. 
           महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये नैपुण्य, उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि मागील वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र,रोख रक्कम देऊन प्रमुख पाहुण्यांचा हस्ते गौरविन्यात आले. 
             श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याने या संस्थेकडून सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ह.भ.प. रमेश महाराज कुलकर्णी (वासुंदे, ता. पारनेर), ह.भ.प.नाना महाराज गांडाळ(आणे ), ह.भ.प. बाळशीराम महाराज बांगर (बेल्हे ), ह.भ.प. बजरंग महाराज आंधळे(कर्जुले हर्या ता. पारनेर ) यांस पांडुरंग गौरव पुरस्कार; श्री ज्ञानेश्वर खराडे(मंगरूळ), श्री. पोपट दाते (आणे), श्री.कारभारी औटी (राजुरी), श्री. विष्णू उनवणे (निमगाव सावा) यांस शिक्षण क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कार्याबद्दल विश्वामित्र गौरव पुरस्कार; सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री.शिवाजी नानाजी चव्हाण  (पारगाव ), श्री.धोंडिभाऊ पिंगट (बेल्हे ), श्री.राजाराम चौधरी (शिरोली बु.), श्री.ज्ञानदेव मुळे(साकोरी) यांस दिलीप गौरव पुरस्कार आणि शिक्षणातील गुणवत्तेबाबत कु. श्रेया सचिन दाते (आणे), कु. स्नेहल वसंत पिंगट(बेल्हे), कु.प्राजक्ता तिकोने (रानमळा) यांना एकलव्य गौरव पुरस्काराने सहा.पो.निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, डॉ. पंजाबराव कथे आणि जि. प. पुणेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार साहेब यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन गौरविण्यात आले. 
                            तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी कु. कानिफनाथ डुकरे, कु. प्रांजल विश्वासराव, कु.थोरात मंगेश यांस आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
              सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य यासारख्या कलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दिंडी सोहळा, शेतकरी गीत, आदिवासी नृत्य, कोळी गीत, देशभक्तिपर गीते, मराठमोळी लावणी, सोलोडान्स, ऐतिहासिक अफजल खान वध, फनीडान्स असा कलाविष्कार सादर करण्यात आला. याप्रसंगी मा. पांडुरंग पवार, मुंबई येथील वरिष्ठ पो. निरीक्षक श्री किसन गायकवाड, उद्योजक उमेश कामठे, सरपंच सौ. सुनीता घोडे, उपसरपंच नजीरअहमद चौगुले,जाकीरभाई पटेल,गणपत घोडे, सोपान गाडगे, निवृत्ती गाडगे, भालचंद्र उनवणे, प्राचार्य डॉ. विलास जोशी, डॉ. वसंत गाडगे, प्रा. छाया गायकवाड, माजी विद्यार्थी, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक वृंद आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्नर उपविभाग जुन्नर यांच्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्यात भरोसा सेल ची स्थापना व उद्घाटन संपन्न

 ग्राहक समाचार News/ Web chanal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत

          दि. ११/२/२०२० रोजी स.११:३० वा 
जुन्नर तालुक्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी व महिलांना संकटकाळात मदत मिळावी या उद्देशाने जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार नारायणगाव पोलीस स्टेशन सभागृह या ठिकाणी भरोसा सेलची स्थापना व उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
          या सेलचे उदघाटन दिपाली खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे  सौ. अर्चना आशिष माळवदकर (पंचायत समिती सदस्य), सौ धनश्री अमित बेनके, डॉ अनुष्का प्रविण शिंदे ( एम.डी. होमिओपॅथीक साई हॉस्पी ना. गाव), सिमा डोंगरे सरपंच आर्वी, राजश्रीताई बोरकर, 
यांच्या हस्ते करण्यात आले.
       यावेळी  दिपाली खन्ना यांनी महीलां विषयक कायदे, सायबर गुन्हे, निर्भया पथक या बाबत मार्गदर्शन करून काही अडचण आल्यास तात्काळ आम्हांस कळवावे किंवा पोलीस स्टेशन स्थरावर भरोसा स्थापन केला असून त्यांना माहीती दयावी तसेच उपविभागीय स्थरावर एक समिती स्थापन केली असून त्या मध्ये डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्त्या यांचा समावेश असून आपल्या तक्रारीचे अडचणी चे  तात्काळ निरसरण केले जाईल तसेच रात्री अपरात्री काही महीलांना वाहन अथवा घरापर्यत पोहचवण्या साठी वाहन उपलब्ध केले जाईल या बाबत मार्गदर्शन केले तसेच डॉ अनुष्का शिंदे यांनी विदयार्थीनीना शारिरीक तसेच मानसिक समस्या बाबत मार्गदर्शन केले.तसेच सौ.धनश्री अमित बेनके, सौ.डॉ. मनिषा शिंदे आळेफाटा यांनी मार्गदर्शन केले 
     यावेळी .टी.वाय. मुजावर (पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस स्टेशन), युवराज मोहीते (पोलीस निरीक्षक जुन्नर पोलीस स्टेशन), परशुराम कांबळे (सहा.पो.निरीक्षक ओतूर )यांनी आपले विचार व्यक्त केले.
        .
      यावेळी जुन्नर उपविभाग जुन्नर मधील भरोसा सेल मधील अधिकारी,नारायणगाव, आळेफाटा व ओतुर पोलीस स्टेशन हद्दीमधील महिला पोलीस पाटील, महिला सरपंच, उपसरपंच, सदस्य , ग्रामसुरक्षा दल, महीला पोलीस मित्र, पोलीस कर्मचारी ,पोलीस पाटील , ग्रामसुरखा दल , कला वाणिज्य महाविदयालय,रा.प. सबनिस विदयालय च्या विद्यार्थीनी, स्थानिक महिला व ग्रामस्थ, उपस्थित होते,
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन घोडे पाटील यांनी केले व आभार स्मिता नवघरे महिला  (पोलीस उपनिरीक्षक जुन्नर पोलीस स्टेशन) यांनी मानले

Monday, February 10, 2020

खासदार डॉ.अमोल कोल्हे आयोजित मोफत कर्णबधिर तपासणी शिबिरास नारायणगाव मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्राहक समाचार  News / Web chanal

(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)

कार्यकारी संपादक  : श्री.अमर भागवत

नारायणगाव- दि.१० शिरूर लोकसभा
मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या  मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील सहावे शिबिर आज नारायणगाव येथे उत्साहात संपन्न झाले.

              जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले.शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या वर्षात एक अभिनव उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवणदोष तपासणी करण्यात आली.         सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे १००० ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली.

           अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अमित बेनके, डॉ. सदानंद राऊत, दिलीप कोल्हे, अरविंद लंबे, गणेश वाजगे, रामदास अभंग, रोहिदास केदारी, शेखर शेटे, राजेंद्र कोल्हे, राजेश कोल्हे, आशिष हांडे, अतुल आहेर , ज्ञानेश्वर औटी, राजेश बेनके, राजेश पाटे, भाऊ देवाडे, सुजित खैरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सुजाता डोंगरे ,जुन्नर तालुका आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर , शरदचंद्र पवार फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्टार्की फाऊंडेशन अमेरिका या संस्थेच्या वतीने डॉ.सुरेश जे पिल्लई, डॉ.रवी गुप्ता, डॉ.सागर कानेकर, डॉ.पी.व्ही सरथ, डॉ.निहार प्रधान, डॉ.यशवंत सिंह, डॉ.सुरजित पेन, डॉ.स्टेजीन बेनी आदींनी कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली.

Thursday, February 6, 2020

तमाशा कलावंतांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नारायणगावातील ग्रामस्थ व कलावंतांनी काढला मोर्चा

ग्राहक समाचार News / Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)
 संपादक : श्री. अमर भागवत
    
        नारायणगाव :  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील साकूर गावी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशा फडावर स्थानिक गाव गुंडांनी मंगळवारी रात्री भ्याड हल्ला केला. या घटनेचा नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गावकरी व तमाशा कलावंतांनी मोर्चा काढून दि.६ रोजी निषेध व्यक्त केला.
            दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिकच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांना फोन करून आरोपींना तात्काळ अटक करावे अशी मागणी केली.
           याबाबत माहिती अशी की, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा साकूर येथे मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्रीचा कार्यक्रम होता. तमाशाच्या नियोजनानुसार साकुरगावी रात्रीचा तमाशा वेळेवर सुरू झाला. व शासनाच्या निर्णयानुसार तमाशा वेळेत बंद करण्यात आला .तमाशा खेळ बंद झाल्यानंतर साकुर गावातील मद्यधुंद नशेतील 10 ते 12 दहशतवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी तमाशातील महिला कलाकारांना गाणी सादर करून नाचण्यासाठी दमदाटी केली . तमाशा फडमालक आविष्कार मुळे व इतर कलाकारांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला .परंतु त्यांनी  ऐकले नाही. महिलांच्या राहुटी मध्ये हे गुंड शिरले . व महिलांचा विनयभंग केला .तसेच महिला व पुरुष कलाकारांना मारहाण केली.
           या घटनेची माहिती नारायणगाव तमाशा पंढरीत समजल्या बरोबर नारायणगाव येथील डॉ महाले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कलाकारांची विचारपूस सरपंच याेगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, संताेष दांगट,गणेश पाटे,तमाशा अभ्यासक काशिनाथ आल्हाट आदी मान्यवरांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली.
          नारायणगाव येथे सर्व ग्रामस्थांनी व सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी एकत्रित येऊन नारायणगाव शहरातून निषेध मोर्चाचे आयोजन केले. लोकनियुक्त सरपंच याेगेश पाटे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, माजी उपसरपंच आशिष माळवदकर , लावणीसम्राज्ञी सीमा पोटे, निवेदक सुधाकर पोटे, तमाशा अभ्यासक काशिनाथ आल्हाट या मान्यवरांनी निषेध पर मनोगते व्यक्त केली.
              या मोर्चात सदस्य राजेश बाप्ते, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष अशाेक पाटे, उपाध्यक्ष डी. के भुजबळ ,विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बबनराव खैरे, पांडूरंग म्हेत्रे, रामभाऊ तोडकरी, राजेश रत्नपारखी ,भा.ज.प पक्षाचे संजय फल्ले, शिवसेना शहर प्रमुख अनिल खैरे , मेहबूब काझी व बहुसंख्य ग्रामस्थ व तमाशा रसिक उपस्थित होते.

Monday, February 3, 2020

हाऊसफुल्ल प्रतिसादात रंगला रंगकर्मी प्रतिष्ठानचा "एक होता बांबूकाका" चा प्रयोग

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
उप संपादक : श्रीनिवास शिंदे, अहमदनगर.




नगर - 
            येथील नाटयक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीन नगर शहरातील माऊली सभागृहात राजेंद्र पोळ लिखित आणि शैलेश देशमुख दिग्दर्शित दोन अंकी धम्माल विनोदी "एक होता बांबुकाका" या नाटकाचा प्रयोग नगरकर नाटयरसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवार दिनांक २ फेब्रु रोजी रात्रौ ८:०० वाजता संपन्न झाला. ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. प्रायोजित या विनामुल्य दाखविण्यात आलेल्या नाटय प्रयोगाला नगरकराने खळखळुन हसवत मनमुराद दाद दिली. ज्योती क्रांतीच्या वतीने नगर व नवनागापुर शाखेत कोणत्याही ठेवीवर एक टक्का अधिक व्याज दर देण्याची घोषणा चेअरमन आजिनाथ हजारे यांनी केली. दोन्ही शाखांपैकी कोणत्याही एका शाखेत नाटकाची सन्मानिका घेउन जाऊन ठेवीवर एक टक्का व्याजदर देण्यात येणार आहेया आकर्षक योजनेच्या माध्यमातून नगरकर नाटय रसिकाना ही एक वेगळी पर्वणीच मिळणार आहे.



              आमदार संग्राम जगताप, नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे, ज्योती क्रांती को-ऑप सो.लि. चे चेअरमन आजिनाथ हजारे, सहप्रायोजक आणि उद्योजक अविनाश कुलकर्णी,सचिन फोटोजचे सचिन खटावकर,माऊली पेवर्सचे राहुल उजागरे, रामकृष्ण कस्ट्रकशनचे सुहास क्षीरसागर, विभागीय पोलीस अधिक्षक संदीप मिटके,श्रीरामपूर विभाग पोलीस अधिक्षक दिपाली काळे,शेतकरी उद्योजकचे अभिजित हजारे,सुवर्णयोग सहकारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र गुंजाळ, सेक्रेटरी बबन नागरे, जेष्ठ नाटय लेखक सदानंद भणगे,नाटयकर्मी मकरंद खेर, अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे नगर विभागप्रमुख शशिकांत नजान, अ.भा. मराठी नाटय परिषद मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके, नियमाक मंडळ सदस्य सतीश शिंगटे, नगर शाखा अध्यक्ष अमोल खोले,माधव देशमुख आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा उर्मिला लोटके हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रितेश साळुंके, प्रमुख कार्यवाह नानाभाऊ मोरे,शैलेश देशमुख,श्रीया देशमुख,रविंद्र व्यवहारे, तुषार चोरडिया,अविनाश कराळे,वैभव कुऱ्हाडे,वसी खान यांनी मान्यवरांचा याप्रसंगी स्वागत सत्कार केला. 
                 नगरची रंगभुमी ही स्पर्धात्मक रंगभुमी म्हणुन ओळखली जाते,राज्यासह देशपातळीवर नगरचे कलावंत आपल्या नगरचे नाव मोठे करत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन आपल्या शुभेच्छापर भाषणात आमदार जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विराज मुनोत आणि अविनाश कराळे यांनी केले तर आभारप्रदर्शन रितेश साळुंके यांनी केले. अशी माहिती संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख अविनाश कराळे यांनी दिली.

Sunday, February 2, 2020

ज्योती क्रांतीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या विद्यालयांना "जोती सावित्री पुरस्कार" जाहीर

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
उप संपादक : श्रीनिवास शिंदे, अहमदनगर. 



नगर-
        नगर येथील ज्योती क्रांती शिक्षण, आरोग्य, क्रीडा व ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जिल्ह्यातील अनेक शाळांना "जोती सावित्री पुरस्कार" जाहीर करण्यात आले. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्याचा पुरस्कारासाठी निवड समितीच्या वतीने निवड करण्यात आली. या पाच जिल्ह्यात असणाऱ्या जामखेड, जवळा, खर्डा, नान्नज, अरणगाव, हळगाव, फक्राबाद, पिंपरखेड, दिघोळ, कर्जत, राशीन, मिरजगाव, पाथर्डी, नगर, नागापूर, श्रीगोंदा, राहुरी, नेवासा, चापडगाव, पाटोदा, आष्टी, कडा, अंमळनेर, शिरुर कासार, केज, वडवणी, गेवराई, बीड,भुम, वाशी, उस्मानाबाद, तेरखेडा, परांडा, शेळगांव, ईट, पाथुड,सोलापूर, करमाळा, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, बार्शी, अकलूज, दौंड, शिरुर, पुणे, इंदापूर या शहरांचा आणि गावांतील सुमारे २५६ विद्यालयांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. ज्ञानदानासारखे अत्यंत महत्त्वाचे कार्य करुन भारताचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या शिक्षक आणि विद्यालयांच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांसाठी हा पुरस्कार भविष्यात निश्चितच प्रेरणा देण्याचे काम करेल, अशी अपेक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्योती क्रांती कॉ-ऑप क्रेडीट सोसायटी लि.चे चेअरमन आजिनाथ हजारे यांनी व्यक्त केली. अशी माहिती ज्योती क्रांती प्रतिष्ठानचे किरण वरपे यांनी दिली.

नारायणगाव पोलिस स्टेशन येथे दोन डीजे मालकांवर गुन्हे दाखल करुन डी.जे.जप्त


ग्राहक समाचार News/ Web Chanal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यसपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
  
           दिनांक 1/2/2019 रोजी रोजी नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना येडगाव गावच्या हद्दीत कुकडी कॉलनी रोडवर 14 नंबर येथे एम. एच. 17 टी.  2266 या वाहनांमध्ये विशाल नवनाथ भोर तसेच विजय मच्छिंद्र मोरे हा त्याच्या एम. एच. 06 जी. 5913 या गाडीवर डी.जे. लावून मोठ्या आवाजात हिवरे या ठिकाणी गाणी वाजवत असताना मिळून आला असल्याने दोन्ही डॉल्बी मालकांवर नारायणगाव पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
              सदर कारवाई मा.पोलिस उप विभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अर्जुन घोडेपाटील,  पोउनि अभिजित पवार, पो.हवा. टाव्हरे, पो.ना. शिंदे, पो.शि. गारगोटे यांनी केली असून पुढील तपास पोलीस नाईक जढर करत आहेत.