Pages

Friday, September 20, 2019

विरोबा पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न... पतसंस्थेकडून सांगलीच्या पूरग्रस्तांना १.५० लाखाची मदत

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत






नारायणगाव : 
                 श्री. विरोबा नागरी सह.पतसंस्था मर्या.,नारायणगाव ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१५ सप्टेंबर १९ रोजी श्री. बाळासाहेब उर्फ नामदेव दत्तात्रय पाटे यांच्या अध्यक्षतेखाली जयहिंद पॅलेस नारायणगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .
               संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री दिनकर शिंदे गुरुजी,श्री शांताराम बनकर ,श्री अशोक वाजगे ,श्री नंदाराम नायकोडी,श्री शांताराम नाईक यांनी दिपप्रज्वलन केले.
              संस्थेच्या अहवाल वर्षात २२.९४ कोटीच्या ठेवी,कर्जवाटप १८.४४ कोटी.ढोबळ नफा ९०.७६ लाख आहे तर थकबाकीचे प्रमाण ३.७२% व एन.पी .ए चे प्रमाण २.४०% आहे. संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीवर सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले.सभासदांच्या गुणवंत विध्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई बुचके तसेच लेखापरीक्षक श्री ज्ञानेश्वर औटी  यांनी सभेस मार्गदर्शन केले. 


              सांगली येथील पूरग्रस्तांना रु.१,००,०००/-ची रोख व रु.२५०००/- च्या जीवनावश्यक वस्तू पतसंस्थेतर्फे देण्यात आल्या. तसेच बस्तवाड,ता.शिरोळ,जि .कोल्हापूर येथे ४ दिवस जाऊन प्रत्यक्ष जाऊन तेथील पुरग्रस्थांचे पुनर्वसन करणारे नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच व संस्थेचे संचालक श्री योगेश उर्फ बाबु पाटे व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे युवक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व डॉक्टरांची टीम अशा ६० जणांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
          सर्व सभासदांना सालाबाद प्रमाणे याही वर्षी संचालक मंडळाने १५% लाभांश व दीपावली भेटवस्तू देण्याचे जाहीर केले.      
               अध्यक्षीय मनोगतात श्री बाळासाहेब उर्फ नामदेव दत्तात्रय पाटे यांनी संस्था चालू वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असल्यामुळे सभासदांच्या सूचना मागविण्यात आल्या व सभासदांना रौप्य महोत्सवा निम्मित खास भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शाळकरी मुलांना मोबाइल व टी.व्ही. पासून दुष्परिणाम होत असल्यामुळे त्यापासून दूर ठेवण्याचे आव्हान करण्यात आले. नारायणगाव परिसरातील बेवारस प्रेतांचा अंत्यविधीचा खर्च यापुढे  पतसंस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.


             संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कांतीलाल बोरा,संचालक श्री धर्मेंद्र गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले व प्रगतीचा आढावा घेतला तर सभेपुढील विषयांचे वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. ललित वाणी यांनी केले.आभार प्रदर्शन संस्थेचे मा.सचिव श्री राजेंद्र पाटे  यांनी केले.

No comments:

Post a Comment