ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत
कार्यकारी संपादक : अमर भागवत
मंगळवार दि.१७ रोजी नारायणगावातील ४१ ठिकाणी २ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन नारायणगाव चे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्या सौ.आशाताई बुचके यांच्या हस्ते पार पडले.
सौ.आशाताई बुचके यांच्या जि.प.पुणे निधीतून,ग्रामपंचायत नारायणगाव ग्रामनिधी व १४ व्या वित्त आयोगातून ,वार्ड नं.१ मध्ये ४१ लाख रु.वार्ड नं.४० लाख ७० हजार रु.वार्ड नं ३ मध्ये ६० लाख रु,वार्ड नं.४ मध्ये ६० लाख ५० हजार रु,वार्ड नं.५ मध्ये १८ लाख रु,वार्ड नं.६ मध्ये ३९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन जि.प.सदस्या सौ.आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आले.
आशाताईंच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे नारायणगावातील समस्त ग्रामस्थ विधानसभा निवडणुकीत नक्कीच आशाताई यांच्या सोबत असतील अशी अपेक्षा लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच बाबुभाऊ पाटे,वि.स.सा.का.संचालक संतोषनाना खैरे,ग्रामविकास अधिकारी नाईकडे भाऊसाहेब,होडगे भाऊसाहेब,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,तंटामुक्ती अध्यक्ष औटी साहेब,उपसरपंच मानिशाताई मेहेत्रे,ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार,संतोष दांगट,रुपाली जाधव,सारिका डेरे,अनिता कसाबे,अश्विनी ताजने,राजेश भैय्या बाप्ते,बाळा वाव्हळ,सुप्रिया खैरे,कुसुम शीरसाठ,पुष्पा आहेर,रामदास अभंग,संगीता खैरे,गणेश पाटे,प्रवीण दिवटे,निलेश जाधव, संतोष गांधी,श्री विरोबा परिवाराचे बाळासाहेब पाटे,वासुदेव कानसकर,रोहिदास भुजबळ,मुक्ताई समाज मंदिराचे डी.के.भुजबळ,एकनाथ शेटे,अशोक पाटे,शंकरराव कोल्हे,राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अनिल खैरे,आशिष माळवदकर,हेमंत कोल्हे,सुदीप कसाबे,संदीप नाईक,अजित वाजगे,शेखर शेटे,गौरव खैरे,जालिंदर खैरे,रोहित भूमकर,संकेत क्षीरसागर,ईश्वर पाटे,अभि शेटे,समीर इनामदार,नंदू अडसरे,सर्वच प्रतिष्ठानचे सभासद,त्या त्या भागातील स्थानिक ग्रामस्थ,महिला वर्ग,मुस्लिम समाजाचे बांधव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.





No comments:
Post a Comment