Monday, January 18, 2021

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी
लघु उपग्रह बनवून एकाच वेळी कोरनार जागतिक, आशियाई व भारतीय विक्रमावर नाव

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया तर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१

'राईस सिटी तुमसर' या नावाने १० विद्यार्थ्यांचा १ गट
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रम साधण्याची सुवर्ण संधी मार्टिन ग्रुप तर्फे उपलब्ध करून दिली आहे. भारतातील १००० बाल वैज्ञानिकांद्वारे एकाच वेळी १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. सदर विक्रमावर नाव कोरण्यासाठी महाराष्ट्रातील ३६० बाल वैज्ञानिकांमध्ये मांडवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब कुटूंबातील प्रज्ञावंत व होतकरू असे इयत्ता ५ वी ते ७ वी च्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २ दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाले असून १९ जानेवारीला नागपूरच्या सेंट विन्सेन्ट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गास आचल बुराडे (इ. ७ वी), प्रज्वल बुराडे (इ. ५ वी), वेदिका ढबाले (इ. ६ वी), राणु मते (इ. ६ वी), योगेश्वरी ढबाले (इ. ७ वी), समिक्षा ढबाले (इ. ५ वी), खुशबु ढबाले (इ. ७ वी), साक्षी ढबाले (इ. ६ वी), अंशुल टांगले (इ. ५ वी) तसेच तुमसरच्या जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे (इ. ७ वी) ह्या दहाही विद्यार्थ्यांना 'राईस सिटी तुमसर' नावाच्या गटाने हजर ठेवण्यासाठी तसेच पालकांना व शाळा प्रशासनास सदर उपक्रमाची संपूर्ण माहिती देवून चर्चा करण्यासाठी १५ जानेवारी रोजी शाळेत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर श्री. दामोधर डहाळे यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट, कार्य याविषयी तसेच स्पेस झोन इंडिया व मार्टिन ग्रुप याविषयीसुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, शिक्षक दामोधर डहाळे, पालक शिवशंकर ढबाले, भारत ढबाले, दुर्वास टांगले, रामकिसन बुराडे, कैलास मते (पोलीस पाटील) उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

*🚀विशेष*
🛰️स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय?
🛰️त्याचे विविध भाग कुठले? व त्यांचे कार्य कसे चालते?
🛰️हेलियम बलून म्हणजे काय?
🛰️या प्रकारच्या उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवतात?
🛰️या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर?,  कुठले सॉफ्टवेअर वापरले जातात?
🛰️अशी सर्व माहिती व प्रशिक्षण खास महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज आहेत.
🛰️जगात सर्वात कमी २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम इतक्या वजनाचे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे दिनांक ७ फेब्रुवारीला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथून अवकाशात सोडून प्रस्थापित केले जातील.
🛰️उपग्रह एका केस मध्ये फिट केले जाणार असून या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल.
🛰️तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर  माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील.
🛰️या पेलोड सोबत काही झाडांच्या बीया सुद्धा पाठवण्यात येत आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल आणि यामुळेच विद्यार्थ्यांची एकाच वेळी जागतिक विक्रम, आशिया विक्रम आणि भारतीय विक्रमात नोंद करुन सहभागी
प्रत्येक विद्यार्थ्यास वरील तिनही प्रमाणपत्रे स्वतंत्ररित्या मिळतील.

विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण करणारा तसेच त्यांना भविष्यात करियर बनविताना नक्कीच उपयुक्त ठरणारा
हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम् येथून राबविला जात असून संपूर्ण भारतात डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया यांच्या मार्गदर्शनात, मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने, मिलिंद चौधरी, ठाणे (जनरल सेक्रेटरी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन) व महाराष्ट्रामध्ये मनिषा ताई चौधरी, नाशिक (महाराष्ट्र राज्य समन्वयक) यांचे नेतृत्वात तसेच दामोधर डहाळे (कोअर कमिटी मेंबर) यांचे सहकार्याने यशस्वी होत आहे.

वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे १० उमेदवार विजयी!भागेश्वर पॅनलच्या ७ उमेदवारांचा विजय

वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार विजयी
भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय
नारायणगाव| वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार 
विजयी झाले आहेत. तर भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय झाला आहे
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
वाँर्ड क्रमांक एक मध्ये
गणपिरबाबा पॅनल चे राजेंद्र तुकाराम मेहेर यांना 451 विजयी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी कुणाल दत्तात्रेय वायकर यांना 325 मते मिळाली आहेत.
राजश्री विशाल काळे यांना विजयी 329 मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी मनीषा सोमनाथ काळे यांना 377 मते मिळाली आहे
महिला सर्वसाधारण मध्ये माया सुजित डोंगरे  यांना 391 विजयी मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रमिला निलेश पाटे यांना 382 एवढी मध्ये मिळून त्यांचा पराभव झाला आहे.  यामध्ये माया सुजित डोंगरे या अवघ्या 9 मतांनी विजयी झाल्या आहेत.
वॉर्ड क्रमांक दोनमध्ये
श्याम भाऊ दुधाने यांना 483 विजय मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी रामा मारुती जाधव यांना 317 मते मिळाली आहेत.
सर्वसाधारण गटांमध्ये माजी सरपंच देवेंद्र सुदाम बनकर यांना 478 विजयी मते मिळाली असून राजेंद्र तुकाराम मेहेर यांना 335 मते मिळाली आहेत.
वार्ड क्रमांक दोनमध्ये वैशाली महेश मेहेर यांना 507 विजयी मते मिळाली असून मीना बनकर यांना 306 मते मिळाली आहेत.
वार्ड क्रमांक 3 मध्ये प्रकाश भालेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
 शुभांगी शाम कानडे यांना 322 विजयी मते मिळाली असून मीना संतोष वारुळे यांना 293 मते मिळाली आहेत
वार्ड क्रमांक 4 मध्ये
आत्माराम दत्तात्रेय संते यांना 507 एवढी विजयी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी गुंजाळ नितीन यांना 448 मते मिळाली आहेत. याच वाँर्ड मध्ये महिला मध्ये ज्योती साईनाथ संते यांना 587 मते मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सुभद्रा बटवाल यांना 372 मते मिळाली आहेत.
   किरण महादेव अल्लाट यांना 515 विजयी मते मिळाली असून आदम अब्दुल कादर कुरेशी यांना 432 मते मिळाली आहेत.
क्रमांक पाचमध्ये विपुल अरुण फुलसुंदर 460 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.  त्यांचे प्रतिस्पर्धी विनायक सुधीर भुजबळ यांना 540 विजयी मते मिळाली आहेत.
रेखा विकास फुलसुंदर यांना 534 विजयी मते मिळाली असून माजी सरपंच ज्योत्स्ना फूलसुंदर यांना 458 मते मिळाली आहेत.
सोनल संदीप अडसरे यांना 546 विजयी मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी सविता पोपट अडअरे यांना 446 मते मिळाली आहेत.
वाँर्ड क्रमांक सहामध्ये
माजी सरपंच जंगल कोल्हे 442 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी सतेज भुजबळ यांना 226 मिळाले आहे
संगिता दत्तात्रय काळे यांना 656  विजयी मते तर कुंदा भीमदेव काळे यांना 499 मते मिळाली आहेत.
 स्नेहल अतुल कांकरिया 754 मते मिळून विजयी झाल्या असून रजनी राजेंद्र गायकर यांना 410 मते मिळाली आहेत.

या निवडणुकीमध्ये गणपीरबाबा ग्रामविकास पॅनलच्या बिनविरोध एका विजयी उमेदवारासह एकूण  10 उमेदवार विजयी होऊन गणपीर बाबा पॅनलने निर्णायक सत्ता मिळवली आहे.
भागेश्वर पॅनलचे उमेदवार माजी सरपंच देवेंद्र बनकर तसेच माजी सरपंच आत्माराम संते यांसह 7 उमेदवार निवडून आले आहेत.
          या निवडणुकीमध्ये माजी सरपंच ज्योत्स्ना सुरेश फुलसुंदर तसेच  बाजार समितीचे संचालक व विद्यमान सदस्य विपुल फुलसुंदर यांचा पराभव झाला असून भागेश्वर पॅनलचे प्रमुख प्रकाश मामा पाटे यांच्या सुनबाई प्रमिला पाटे यांचा अवघ्या 9 मतांनी पराभव झाला आहे

Monday, January 11, 2021

घोडेकर हल्ल्यातील मुख्य सुत्रधारा सह सुपारी घेणारा कुविख्यात गुंड व हल्लेखोर 3 दिवसात गजाआड

फोटो मजकूर :नारायणगाव या ठिकाणी झालेल्या खूनी हल्ल्यातील पकडण्यात आलेले आरोपी सोबत पोलीस अधिकारी डी के गुंड व तपासी पोलीस कर्मचारी
नारायणगाव येथील कोल्हे मळा चौकात संग्राम घोडेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील हल्लेखोर व सुपारी घेणा-रा कुविख्यात गुंड गणेश रामचंद्र नाणेकर यांस नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
                          या घटनेतील मुख्य आरोपी चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे हा पोलिसांच्या ताब्यात असून ह्या प्रकरणात सुपारी घेणारा गणेश नाणेकर ,रा .नाणेकर वाडी, चाकण,
अजय उर्फ सोन्या राठोड, वय २३,रा १४ न ,तसेच खबऱ्या संदीप बाळशीराम पवार वय २०,रा पिंपळवंडी ता जुन्नर,व दोन अल्पवयीन हल्लेखोर यांस पोलिसांनी चाकण येथून ताब्यात घेतले असून दुसरा सूत्रधार प्रशांत माने फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जानेवारी रोजी संग्राम घोडेकर याच्यावर हल्ला करून फरार झालेले दोन अल्पवयीन गुन्हेगार व अजय उर्फ सोन्या राठोड हा अलिबाग या ठिकाणी वास्तव्यास होते या घटनेतील दुसरा सूत्रधार प्रशांत माने व सुपारी किंग गणेश नाणेकर या दोघांची पूर्वीची मैत्री होती त्यांनी शेखर कोऱ्हाळे यांच्याबरोबर डिसेंबर २०२० मध्ये या हल्ल्याबाबत ची आखणी केली होती या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर केल्यावर जामीन लवकर होऊन मुलांना सोडवता येईल म्हणून त्यांनी त्या घटनेत अल्पवयीन मुलांचा वापर करायचा ठरवला त्यानुसार  गणेश नाणेकर याने सुपारी घेऊन ही जबाबदारी सोन्या राठोडवर सोपवली गणेश नाणेकर यावर विविध पोलीस ठाण्यात शरीराला अपाय करण्याबाबतचे व इतर गंभीर गुन्हे तर  हल्लेखोर अजय उर्फ सोन्या राठोड याच्यावर चोरी,अपहरण करून खून करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ७ जानेवारी रोजी हल्ला करण्यापूर्वी या गुन्ह्यातील संदीप पवार हा संग्राम घोडेकर यांच्यावर पाळत ठेवून होता त्यानुसार पवार यांनी अजय उर्फ सोन्या राठोडला संग्राम घोडेकर यांच्या हालचाली ची माहिती देऊन सोन्या राठोड याने दोन अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन संग्राम घोडेकर यांच्यावर कोल्हे मळा येथे कोयत्याने  हल्ला चढवला या हल्ल्यानंतर नारायणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नारायणगाव पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य सूत्रधार चंद्रशेखर को-हाळे यास अवघ्या सहा तासाच्या आत ताब्यात घेतले व पुढील गुन्हेगार लवकरच शोधून काढून असा शब्द सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी ग्रामस्थांना दिला होता त्यानुसार तीन दिवसाच्या आत यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्यास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नारायणगाव ग्रामस्थांमधून या अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
           सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पो उप नि गुलाब हिंगे,पोलीस नाईक दिनेश साबळे,पालवे,पोलीस शिपाई सचिन कोबल,शैलेश वाघमारे,शाम जायभाय,संतोष साळुंखे,योगेश गारगोटे यांच्या पथकाने केली  केली.


Sunday, January 10, 2021

गणपीरबाबा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून पॅनल प्रमुख संजयशेठ वारुळे यांसह उमेदवार मतदारांच्या भेटीला.

           
           नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील ग्रामपंयत निवडणुकीचे पडघम जोरदारपणे उमटु लागल्याचे दिसुन येत आहे.या निमित्ताने सन 2021 ते 025 करिता होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ येथील सामाजीक कार्यकर्ते श्री. संजयशेठ वारुळे व त्यांच्या सहका-या सोबत विविध ठिकाणातील ( वार्ड क्रमांक 1 ते 6 ) मधुन फोडण्यात आला. यावेळी गणपीर बाबा पॅनेलच्या विविध उमेदवारांनी प्रत्येक प्रभागातुन शक्ती प्रदर्शनार्थ  मतदारांच्या घरोघर भेटी घेण्यासाठी संपर्क साधला.गणपीर बाबा पॅनेलने गेल्या पंचवार्षीक ग्रामपंचायत कारकिर्दीच्या माध्यमातुन अनेक विकास कामे केली हे आजही येथील मतदार सांगताना विसरत नाही.या मध्ये मुख्यत: नुतन ग्राम संसद भवन ,नळपाणी पुरवठा योजना,रस्ते,बंदिस्त गटार योजना,विज प्रश्न,वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नाणी पार्क, बालोद्यान व व्यायाम शाळा उपकरणे उपक्रम, शाळा कॉलेज व खेडो पाड्याकडे जाणारे आणि गल्ली बोलातुन जाणा-या सिमेंट काॅंक्रेटीकरणाचे रस्ते, नारायणगाव व वारुळवाडीस जोडणारा पुल परिसराचे सुशोभीकरणाचा समावेश असणे हि त्यांच्या जमेची बाजु असल्याचे मतदार व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.एकंदरीत या निवडणुकीत गणपीर बाबा पॅनेलचे सर्व उमेदवार भरगोस मोठ्या मतांनी विजयी होतील असे ग्राहक समाचार विशेष प्रतिनिधीनी घेतलेल्या आढाव्यातुन समजते.

Saturday, January 9, 2021

बंद घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपीस नारायणगाव येथे स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

                नारायणगाव : पुणे ग्रामीणचे
 पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी
 जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार खेड जुन्नर भागात रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा तपास करत असताना बंद घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
        सागर मनोज विटकर वय 26 रा.नारायणगाव वाजगे आळी हा नारायणगाव बस स्टॅन्ड या ठिकाणी संशयित रित्या फिरताना आठळला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवा उडविची उत्तरे दिली म्हणून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या खिश्या मध्ये 3 मोबाइलल मिळून आले त्या बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता ते मोबाइलल त्याने वाजगे आळी नारायणगाव येथून चोरल्याचे सांगितले.
त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्या घरातून एक सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.
            सदर बाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.381/2020 भा.द.वि 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.तसेच यापूर्वी या आरोपीवर 
1) जुन्नर पोस्टे गु.र.नं 91/2014 भा.द.वी. कलम 395 
2) जुन्नर पोस्टे गु.र.नं 82/2014 भा.द.वी. कलम 392
3) घोडेगाव पोस्टे गु.र.नं.49/2014 भा.द. वि कलम 395  पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.
         सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून नारायणगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
         सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांच्या सुचने नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे,
पोहवा.विक्रम तापकीर,पोना.दीपक साबळे,
पोशी. संदीप वारे,पोशी. अक्षय नवले,पोशी. निलेश सुपेकर,पोहवा.हनुमंत पासलकर यांनी केली आहे.

Tuesday, January 5, 2021

नारायणगाव येथे ३५०० किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोघेजण ताब्यात

नारायणगाव येथे ३५०० किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोघेजण ताब्यात
नारायणगाव : दि.०५/०१/२०२१ रोजी पहाटे ०३:३० वा.च्या सुमारास मौजे वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर नाशिक-पुणे रोड जवळ टेम्पो मधून ३५००किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोन जण फिर्यादी व साक्षीदारांना मिळून आले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून दोन दिवस पोलिस कोठडी मिळालेली आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिली.
             याबाबतची फिर्याद शिवशंकर 
राजेंद्र स्वामी वय २७ वर्ष धंदा समाजसेवा रा. 1177 /33, रेव्हेन्यु कॉलनी शिवाजी नगर पुणे 41 10 05 यांनी दिली आहे.
              यातील आरोपी1)सुफियान
 शब्‍बीर अन्सारी वय 33 वर्ष,धंदा ड्रायव्हर, राहणार शिळफाटा मुंब्रा,ठाणे जिल्हा 
2)अश्फाक मोहम्मद हनीफ आतार  वय 40 वर्ष,धंदा मजुरी, राहणार मंगळवार पेठ जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या दोघांना अटक असून दोन दिवस पोलिस कोठडी मिळालेली आहे.
                पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०५/०१/२०२१ रोजी पहाटे ०३:३० वा.च्या सुमारास मौजे वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर नाशिक-पुणे रोडवर सदर आरोपिंनी त्यांच्या ताब्यातील आयशर कंपनी टेम्पो गाडी नंबर एम एच१४ एच जी २४०९ यामध्ये गाई व बैलांचे कापलेले मांस अंदाजे वजन ३५०० किलो किमत ५,२५,००० रुपये किमतीचे त्यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना गोवंश कापणे व वाहतूक करणे बंदी असताना वरील नमूद वाहनांमधून वाहतूक करताना फिर्यादी व साक्षीदारांना मिळून आले आहेत म्हणून वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गु.र.नं व कलम:- ०२/२०२१ पशु परीक्षण अधिनियम १९४८ कलम५(क),महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ९(अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thursday, December 31, 2020

नारायणगाव पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा चोरट्यांचा ए टी एम फोडण्याचा प्रयत्न फसला!दोघांना रंगेहात पकडले

        नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन ची चोरी करत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला त्यामुळे एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.तद्नंतर दि 30 रोजी रात्रीच्या सुमारास बस स्थानका समोरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि के गुंड यांनी दिली.    
              सध्या पुणे जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी ए.टी.एम. चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे  हद्दीमधील रात्र गस्त अधिकारी कर्मचारी यांनी जास्त लक्ष हे ए.टी.एम.व बंद फ्लॅट मध्ये चोरी होवू नये या वर ठेवण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी याबबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दि.३०/१२/२०२० चे सेक्टर आधिकारी पो.स.ई हिंगे, पो स्टे चे  पोलीस नाईक दिनेश साबळे , पो.ना. शेख, होम ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे असे रात्र गस्त व ए.टी.एम चेक करत असताना होमगार्ड ठोबळे, पठाण यांना एस.बी.आय.ए.टी.एम मध्ये दोन इसम हे सदर मशीन चे शटर अर्धलावून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते लागलीच प्रसंगावधान राखून होमगार्ड ठोबळे व पठाण यांनी शटर खाली ओढुन बंद केले. त्याच दरम्यान आतील इसमाने त्यांच्या कडील लोखडी टॉमी ने होम. ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.
           सदरबाबत  सहा.पो.निरीक्षक श्री. गुंड यांना माहिती देवुन लागलीच पो.स.ई हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होम ढवळे, खंडे पो.मित्र भरत मुठे, ईश्वर पाटे ऋषिकेश कुंभार व इतर २० ते ३० असे सदर ठिकाणी जमा झाले. 
          सदर  चे आरोपी हे सराईत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची शक्यता असल्याने सुरक्षीततेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन पो.ना.लोंढे,पो ना साबळे,पो.कॉ वाघमारे, कोबल यांनी शटर वर करून सदर आरोपीना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव १) राहूल वसंत सुपेकर मुळ रा निघोज पठारवाडी ता. पारनेर, जि नगर सध्या रा रांजणगाव एम.आय.डी.सी.२) बाजीराव बाळासाहेब नागरगोजे मुळ रा चिंचपुर ता पाथर्डी जि नगर सध्या रा रांजणगाव ता शिरूर जि पुणे* यांना ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशन गु.र.नंबर  ४१६/ २०२० भा.द.वि कलम ३५३,३३२,३८०,४२७, ५११,३४ वगैरे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स.ई. हिंगे हे करत आहे
         सदर कामगिरी हि मा.आभिनव देशमुख सोा,पोलीस अधिक्षक , मा.विवेक पाटील सो, अपर पोलीस अधिक्षक,मा. मंदार जवळे सोा उपविभागीय पो. अधिकारी सोा यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गुंड स.पो.नि ना.गाव पो स्टेशन , पो.स.ई हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होम ढवळे, खंडे यांनी केली आहे